जागेच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर,हल्ल्यात वजीर शेख गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक , तांत्रिक विश्लेषणा आधारे कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपीस ठोकल्या बेड्या
पुणे: वानवडी परिसरात निवृत्त पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्यावर शुक्रवारी रात्री हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना दगडाने ठेचण्यात आले आहे. हल्ल्यात वजीर शेख गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.शेख यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरास तांत्रिक विश्लेषणा आधारे कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
सदर कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ आर राजा व वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पतंगे, गुन्हे निरिक्षक पाटणकर मार्गदर्शनाखालीतपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, हेड कॉन्स्टेबल सरफराज देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड,विष्णू सुतार , यतीन भोसले यांनी कारवाई पूर्ण केली.