Saturday, July 27, 2024
Homeइतरसीतामाईच्या पादुकांच्या स्वागतासाठी सज्ज कदमवाकवस्ती

सीतामाईच्या पादुकांच्या स्वागतासाठी सज्ज कदमवाकवस्ती

प्रतिनिधी सुनिल थोरात हवेली

कदमवाकवस्ती : महाशिवरात्रि च्या पावन मुहूर्तावर सुरू झालेली श्री राम वन गमन रथयात्रा चरण चिन्ह पादुकांची रथ यात्रा पुर्व हवेलीतील उरुळीकांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, थेऊर फाटा, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, टोलनाका, शेवाळेवाडी, मांजरी फाटा, हडपसर येथुन मार्गस्थ होणार आहे.

लोणी काळभोर येथे दिनांक ११ मार्च रोजी दुपारी १११.३० वाजता पोहोचणार आहे. लोणी काळभोर (रामदरा) या ठिकाणी महंतासाठी स्नेह भोजनाची व्यवस्था लोणी काळभोर ग्रामस्थ व रामदरा मंदिराच्या वतीने करण्यात येणार आहे. दोन तासाच्या विश्रांती नंतर कदमवाकवस्ती टोल नाका येथे दुपारी २.३० वाजता पाच मिनिटांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी थांबणार असल्याचे संयोजक दादा मनोज भंडारी, विशाल वेदपाठक, यांनी सांगितले.

टोल नाका येथे ऋषभ अमृत नाना कामठे फाऊंडेशन च्या वतीने फाऊंडेशनचे मुख्य सल्लागार मधुकर कामठे व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ कामठे हे या सीतामाई च्या पादुकांचे स्वागत करणार आहेत. तरी सर्वांनी दर्शनासाठी व स्वागतासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी ऋषभ अमृत नाना कामठे फाऊंडेशन च्या वतीने संस्थापक अध्यक्ष ऋषभ कामठे, हरियश कामठे, विकास कामठे, जयश कामठे, आसेफ शेख, वेदांत चोरघडे, अथर्व चोरघडे, मयुर गोलांडे, रोहन बोबडे, आर्यन चोरघडे, मयूर सायकर, आकाश काळभोर सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!