Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्यासि.लुसी कुरियन यांचे काम हे दिव्यत्त्वाचे, समाजाला प्रेरणा व ऊर्जा देणारे -...

सि.लुसी कुरियन यांचे काम हे दिव्यत्त्वाचे, समाजाला प्रेरणा व ऊर्जा देणारे – डॉ गिरीश कुलकर्णी

माहेर संस्थेचा २७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

कोरेगाव भिमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर)  माहेर संस्थेचे व सि. लुसी कुरियन यांचे काम हे दिव्यत्त्वाचे आहे , समाजाला प्रेरणा व ऊर्जा देणारे असून  समाजासाठी वेगळी वाट निवडली. हिंदू धर्मातील विचारानुसार फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याचे काम निस्वार्थपणे लुसी कुरियन करीत असून त्या आधुनिक आधुनिक सावित्रीबाई व मदर तेरेसा असल्याचे गौरवोद्गारसमाज सेवक व स्नेहालय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माहेर संस्थेचा २७ वा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

      कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी रेखाटलेली चित्रे, विज्ञान प्रदर्शन, कलाकुसरीच्या वस्तू  यांच्या स्टॉलचे उद्घाटन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करून करण्यात आली. संस्थेतील बालकांनी ढोल, लेझीम गजरात व संस्थेतील मुलांनी सर्वधर्म प्रार्थनेने व तबला वादनाच्या अविष्काराने सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाचे वाचन करण्यात येऊन माहेर केंदूर या शाखेतील मुलांनी प्रार्थना डान्स केला. आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

    माहेर संस्थेच्या संस्थापक संचालिका सि. लूसी कुरियन यांनी आपल्या मनोगतामध्ये माहेर संस्थेचे काम समाजातल्या दानशूर लोकांच्या व हीतचिंतकांच्या मदतीमुळे पुढे जात असल्याचे तसेच माहेर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाढत असल्याचे मत व्यक्त केले व सर्वांना सत्ताविसाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    संस्थेतील बालकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व बालकांनी नृत्य आविष्कार करून सर्वांची मने जिंकली. तसेच तायकांदो हा धाडसी खेळ प्रकार सादर करून मुलांबरोबरच मुलीही कोणत्याही गोष्टीत कमी नसल्याचे दाखवून दिले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे सन्मान व स्वागत माहेर संस्थेतील बालकांनी पर्यावरण पूरक बनवलेल्या वस्तू भेट देऊन करण्यात आले. 

    कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालय फाउंडेशनचे गिरीश कुलकर्णी, ऑस्ट्रेयाचे उल्फगॅंग स्वेगर, मिस्टर गॅरेट, वढू गाव चे सरपंच अंजली शिवले, आपटी गावचे सरपंच सुनीता शिवले, वाजेवाडी सरपंच पूनम चौधरी, सणसवाडीचे सरपंच रूपाली दरेकर, पिंपळे गावचे सरपंच सोनल नाईकनवरे, कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, पत्रकार शरद पाबळे, उदयकांत ब्राम्हणे, शेरखान शेख,विठ्ठल वळसे पाटील, लक्ष्मण गव्हाणे, जीवन टोपे, सचिन धुमाळ, आकाश भोरडे, रोहिणी गोसावी, नितीन  वाजे, संजय भंडारे, लाला तांबे, गणेश चव्हाण, धर्मराज वाजे, सतीश भोंडवे, पांडुरंग आरगडे, बासू सर, एम ए बागवान, डॉ. एस आर येरमल, खास कर्नाटक इथून आलेले कल्याण शेट्टी,  परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या सारिका शिवले, माहेर संस्थेच्या संस्थापिका, संचालिका सि. लूसी कुरियन व अध्यक्ष हिरा बेगम मुल्ला, ट्रस्टी अनिरुद्ध गडांकुश, योगेश भोर, डॉ. प्रदीप शर्मा, डॉ.निकोला पवार, सोसायटी मेंबर एलन डिसूजा, इत्यादी  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावना सुनील कांबळे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे व टेरेसा  अँथोनी यांनी केले आभार प्रदर्शन तेजस्विनी पवार यांनी केले.यावेळी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी करण्यासाठी माहेर कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!