Thursday, June 20, 2024
Homeइतरसाहेब तेव्हढ विहिरीवरील केबल वायरी चोरणाऱ्यांच काही तरी करा... 

साहेब तेव्हढ विहिरीवरील केबल वायरी चोरणाऱ्यांच काही तरी करा… 

वढू बुद्रुक येथील शेतकऱ्यांची पोलीस प्रशासनाला आर्त विनवणी 

वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील विहिरीवरिल केबल वायरी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला असून यामुळे शेतीचे पिकाचे नुकसान होत असून जनावरांना पाणी पाजण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी पोलीस प्रशासनाला साहेब तेव्हढ विहिरीवरील केबल वायरी चोरणाऱ्यांच काही तरी करा अशी आर्त विनवणी करत आहेत.

     वढू बुद्रुक येथील १५ ते २० शेतकऱ्यांच्या विहीरीवरील मोटारीला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल वायर चोरून नेण्याचा चोरांनी सपाटा लावला आहे.या केबल वायरी तांब्याच्या असल्याने  त्या पाण्यातील मोटारीला खाली जोडलेल्या असतात त्यामुळे विशिष्ट पद्धतीने चोरी होत असून वायर तोडल्याने शेतकऱ्यांना ती मोटार खोल विहिरीतून खेचून वर काढणे अत्यंत जिकरीचे ठरत आहे तसेच यामध्ये फिटर व मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने मेटाकुटीला आले आहेत.

     विहिरींवरील मोटारीच्या केबल वायर मोठ्या प्रमाणात चोरीला जात आहेत.यामुळे मोटार विहिरी बाहेर काढणे व वायर जोडणे यासाठी खूप कष्ट करावे लागत आहेत.शेतीचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाने संबधित प्रकरणी तातडीने कारवाई करत केवळ चोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती आहे .- माजी सरपंच अनिल शिवले, वढू बुद्रुक

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!