Saturday, July 27, 2024
Homeइतरसाहेबांनी ठरवले तर अशोक पवार राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील , किसके नसिब का...

साहेबांनी ठरवले तर अशोक पवार राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील , किसके नसिब का क्या बोले…. – एकनाथ खडसे

समस्यांपेक्षा विकास कामांची चर्चा नागरिकांकडून ऐकायला मिळते, शिरुर-हवेली मतदार संघ भाग्यवान

कोरेगाव भीमा -. शिरूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (ता. ५ फेब्रुवारी) यांनी अर्धा दिवस देत शिरूर तालुक्यातील विविध कार्यक्रमात आमदार अशोक पवारांच्या सोबत राहिलेल्या खडसेंनी पवार दांपत्याच्या कामाची पद्धत व नागरिकांचा आमदार दांपत्यावरील जिव्हाळा पहिला आणि शिरूर करांचा प्रेमाचा पाहुणचार घेत आमदार अशोक पवार यांना प्रकृतीची काळजी घेत ,वेळेवर जेवण करण्याचा प्रेमाचा सल्ला सल्ला दिला.

मोठ्या साहेबांनी ठरवले तर अशोक पवार मंत्रिमंडळात दिसतील ,किसके नसिब का क्या बोल असे म्हणत आमदारांच कौतुक करणारा मतदार संघ पहिल्यांदाच पाहतोय नाहीतर आम्ही इतर ठिकाणी पाहतो की आमदारांनी हे काम केलं नाही ,ते काम केलं नाही .अशा कामाच्या समस्या तक्रारी सांगणारी लोक जास्त असतात पण शिरूर – हवेली मतदार संघातील नागरिक आमदारांनी हे काम केलं आमदारांनी ते काम केलं अस सांगतात हे खूप छान वाटलं .शिरूर हवेली मतदार संघ हा भाग्यवान आहे . काम करणारा आमदार लाभला आहे असे मत व्यक्त करत एकनाथ खडसे यांनी आमदार अशोक पवार यांचे मंत्री होण्याबाबत आपली भविष्यवाणी करत आमदारांच्या विकास कामांचे व शिरूर हवेली तालुक्यातील जनतेचे कौतुक केले.खडसे यांच्या या वक्तव्याची क्लिप सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आमदार पवार समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या सुधारीत युनिटच्या उद्‌घाटनाच्या सकाळच्या सत्रातील कार्यक्रमात त्यांनी आमदार अशोक पवार यांच्या कामकाजाची, प्रश्नांना भिडण्याची, ती सोडविण्याच्या पद्धतीची माहिती अशोक पवार यांच्या राजकीय यशाच्या सूत्रधार जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांच्याशी अनौपचारीक गप्पा मारत जाणून घेतली.त्यानंतर त्यांनी शिक्रापूर, शिरुर तसेच तालुक्यातील काही भागांना आमदार अशोक पवार यांच्या सोबत भेटी दिल्या. एकनाथ खडसे यांच्या आमदार अशोक पवार यांच्या कामांचे कौतुकाची थाप आणि मोठ्या साहेबांनी ठरवले तर राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील या भविष्य वाणीने शिरूर हवेली मतदार संघात उत्साह संचारला असल्याचे दिसत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!