Monday, June 17, 2024
Homeइतरसावित्री सन्मान फाऊंडेशनच्या मार्फत वृक्षारोपण करत ट्रेकिंग आनंद

सावित्री सन्मान फाऊंडेशनच्या मार्फत वृक्षारोपण करत ट्रेकिंग आनंद

सुनील थोरात हवेली प्रतिनिधी

हवेली (हडपसर) : सावित्री सन्मान फौंडेशन ‘ती’च हक्काच व्यासपीठ आयोजित कानिफनाथ ट्रेक आणि वृक्षारोपण असे कार्यक्रम शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सावित्री फाऊंडेशनच्या सदस्या मार्फत आयोजित करण्यात आला होता. कानिफनाथ ट्रेक आणि वृक्षारोपण करण्यासाठी सावित्री सन्मान फौंडेशनच्या सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कानिफनाथ ट्रेक करताना आपल्याला आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी व समाजातील स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे किती आवश्यक आहे. या विषयी चर्चा करण्यात आली. वृक्षारोपण करून एक सामाजिक बांधिलकी जपत झाडांचे महत्व समजून घेण्यात आले. आपल्या जीवनात आरोग्य आणि निसर्ग यांचे महत्व याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी सावित्री फाऊंडेशन च्या अध्यक्षा वृषाली झगडे, उपाध्यक्षा रुपाली दळवी, सचिव सोनल कोद्रे, सहसचिव वर्षा उनुउणे, संचालक मंगल रायकर. सदस्य वृषाली वाडकर, सदस्य सोनाली ताम्हाणे, सदस्य सोनाली कुलकर्णी यावेळी उपस्थित होत्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!