कोरेगाव भीमा ग्राम पंचायतीच्या बॅनर ची शिरूर हवेली तालुक्यासह प्रवाशांमध्ये चर्चा
सार्वजनिक स्वच्छतेसाठी म्हसोबाचा बॅनर लावत कचरा समस्येवर मात करण्याचा प्रयत्न
कोरेगाव भीमा – सावधान ! येथे कचरा टाकू नये , येथे कचरा टाकणाऱ्याच्या घरावर म्हसोबा कोप होईल त्याच्या घराचा कचरा कचरा होईल , येथे कचरा टाकणारी व्यक्ती गाढव असेल तसेच येथे कचरा टाकताना आढळल्यास एक हजार रुपये दंड असा ग्राम पंचायतीच्या वतीने बॅनर लावण्यात आला याची सध्या शिरूर – हवेली तालुक्यासह प्रवाशांमध्ये मोठी चर्चा होत असून यामुळे कचरा प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा वाटत आहे.कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील भीमा नदी व पुलाच्या बाजूला कचरा टाकण्यासाठी आणलेला कचरा अक्षरशः परत नेताना दिसत असून हा चमत्कार कोणी कर्मचारी किंवा दंडाने नाहीतर एका बॅनरने घडवला आहे.
पेरणे फाटा व कोरेगाव भिमा येथे कंपनी कामगार व प्रवासी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत असतात याबाबत ग्राम पंचायत व ग्रामस्थांच्या माध्यमातून विनंती , आवाहन अक्षरशः दंड आकारण्याचा इशारा देऊनही कचरा टाकण्याचे प्रमाण काही कमी होत नव्हते याबाबत कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेणे अत्यंत गरजेचे असून कचरा आणणाऱ्या कामगारास कंपनीच्या गाडीत प्रवेश देऊ नये तसेच कचरा टाकण्यासाठी कुठेही गडू थांबवू नये यासाठी सूचना करण्यात याव्यात , ग्रामस्थांनी याबाबत इशाराही दिला आहे की, सबंधित कामगार कचरा टाकताना आढळल्यास त्याच्या गाडीत सर्व कचरा भरून देण्यात येऊन दंड आकारण्यात येणार आहे.
स्वतःचे घर स्वच्छ ठेवण्यासाठी इतरांच अंगण अथवा गाव घान करणे हे अत्यंत निंदनीय व लज्जास्पद आहे जर कोणी कोरेगाव भिमा येथे कचरा टाकताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच स्वच्छतेसाठी व ग्रामस्थांच्या आरोग्यासह भीमा नदीच्या स्वच्छतेसाठी आम्ही बॅनर लावला आहे यातून स्वच्छता राखणे हा मुख्य उद्देश आहे. – सरपंच अमोल गव्हाणे ,कोरेगाव भीमा
कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील स्वच्छतेची पाहणी करत उपाय योजना करण्याची चर्चा करताना सरपंच अमोल गव्हाणे व ग्रामस्थ