प्रतिनिधी मिलिंदा पवार सातारा
सातारा – दिनांक ९ मार्च
श्रीमंत छञपती प्रतापसिंह महाराज सेवाधामच्या माध्यमातून साता-यासह सामुदायिक अग्निहोत्र साजरा करण्याचे नियोजन शिवपुरी संस्थेने केले आहे. साता-यात त्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्षा वृषालीराजे भोसले यांनी दिली. भारतातील कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र, हैद्राबाद आदी ठिकाणी तसेच जगभरातील अग्निहोत्र आचरणकर्ते १२ मार्च हा दिवस “विश्व अग्निहोत्र दिन” म्हणून साजरा करतात. अग्निहोत्र यज्ञाकडे वैज्ञनिक दृष्टीकोनातून पहावे. या माध्यमातून पर्यावरण पूरक शास्त्रीय प्रयोग होत आहेत. अग्निहोत्र हा वातावरण शुध्द करण्याचा वैदिक उपाय असून यज्ञ, दान, तप, कर्म, स्वाध्याय या पंचसाधन मार्गाच्या सिध्दांतावर आधारीत आहे. संपूर्ण मानव आणि सृष्टीच्या कल्याणासाठी परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे द्वारा कथन केला गेला आहे.१२ मार्च हा दिवस सामूहिक स्वच्छता, अन्नदान, रक्तदान, रुग्णसेवा, खावू वाटप, गरजूंना मदत अश्या विविध समाज उपयोगी कामे करून साजरा करण्यात येतो. डॉ. पुरुषोत्तमजी राजीमवाले ऊर्फ राजाभाऊ महाराज व बाळाप्पा महाराज मठ, गुरुमंदिर व अध्यक्ष विश्व फौंडेशन शिवपुरी अक्कलकोट यांच्या पवित्र उपस्थितीत आणि श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचे अध्यक्षतेखाली सामूहिक अग्निहोत्र सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.
यावेळी दर्शन व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच त्यापूर्वी संस्थेद्वारा सकाळी १० ते २ या वेळेत मोफत नेत्रतपासणी शिबिरही होणार आहे. नित्य अग्निहोत्र केल्याने घरातील वातावरण शुध्द, पवित्र राहते. ते सुगंधी पुष्टी तत्वाने भारले जाते. सुर्योदयाच्या अग्निहोत्राचा इष्ट परिणाम सुर्यास्तापर्यंत व सुर्यास्ताचा अग्निहोत्राचा इष्ट परिणाम सुर्योदयापर्यंत टिकून राहतो. याव्दारे अग्निहोत्रास्थानी स्वास्थ्य व कल्याणकारी चक्र कार्यरत राहते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून स्वास्थ्य लाभते. वातावरणात रोगाणूच्या वाढीस प्रतिबंध होतो. व्यसनमुक्त, चिडचिडा, हट्टी व मतिमंद मुलांवर हे फारच उपयुक्त ठरते. अग्निहोत्र आचाराने ध्यान, धारणा, योग, जप आदी कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक साधना लाभते. अग्निहोत्राद्वारा वातावरण शुध्दी होते. याला अल्पावधीतच जागतिक मान्यता मिळाली, म्हणून १२मार्च हा दिवस जागतिक अग्निहोत्र दिन म्हणून ओळखला जातो. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी सचिन जाधव 7588382477, निलेश झोरे 8855073122, विक्रम क्षीरसागर 9763946726 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.