Friday, July 12, 2024
Homeकृषिसाताऱ्यात ट्रॅक्टर अपघात 4 महिलांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

साताऱ्यात ट्रॅक्टर अपघात 4 महिलांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

सातारा – साताऱ्यात (Satara News) ट्रॅक्टरच्या (tractor accident) विचित्र अपघातात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. साताऱ्याच्या कारंडवाडी येथे शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडल्याने ट्रॉलीमधील पाच महिलांपैकी 4 महिलांचा पाण्यात ट्रॉली खाली अडकून जागीच मृत्यू झाला.Tractor accident in Satara 4 women died on the spot and one seriously injured

तर या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सातारा शहरालगत असलेल्या कारंडवाडी येथे ही घटना घडलीय. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी महिलांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांना (Satara Police) या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केलाय. तसेच ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेतातील कामे करून जनावरांचा चारा घेऊन घरी ट्रॅक्टर ट्रॉलीतून महिला जात होत्या. पावसामुळे या परिसरात रस्त्यावर चिखल झाला होता. त्याचवेळी कॅनॉलवरील अरुंद पुलावरून जात असताना निसरड्या रस्त्यामुळे ट्रॉली पलटी झाली. ट्रॉलीतील चार महिला कॅनॉलमध्ये पडल्या. त्यात एक महिला जखमी झाली आहे. ही माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने सर्वांना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील अलका भरत माने (वय 55), अरुणा शंकर साळुंखे (वय 58), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय 65),लिलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60) सर्व रहाणार कारंडवाडी, ता. सातारा या जागीच ठार झाल्या यातील एक महिला जखमी झाली आहे. Tractor accident in Satara 4 women died on the spot and one seriously injured

जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून या प्रकरणात ट्रॅक्टर चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके करत आहेत.

या घटनेने कारंडवाडीत शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यत केली जात आहे.

Tractor accident in Satara 4 women died on the spot and one seriously injured

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!