सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे भागात शुक्रवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली.या हाणामारीत काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास करंजे गावात मारहाणीची घटना घडली.दोन गटातील युवक समोर समोर आले होते.जवळपास २० ते २५ युवकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली.तसेच काहीजणांच्या हातात धारदार शस्त्र होते.मारहाणीचा हा प्रकार बराच वेळ सुरू होता.या घटनेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण झाले असून ही हाती क्लिप लागली आसुन. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती.
सातारा सारख्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा असणाऱ्या सातारा शहरात दोन गटातील हाणामारी मुळे शहरात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असून यासाठी सातारा पोलीस प्रशासन अत्यंत कडक व जरब बसवणारी कार्यवाही होणार की तक्रार नाही म्हणून बघ्याची भूमिका घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.