Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रसातारा जिल्ह्यातील नाट्य रसिकांना मनोरंजनाची पर्वणी

सातारा जिल्ह्यातील नाट्य रसिकांना मनोरंजनाची पर्वणी

सातारा येथे हौशी मराठी राज्‍य नाट्य स्‍पर्धा शाहू_कलामंदिर येथे दिनांक २८ नोव्हेंबर पासून रोज सायंकाळी ७ वाजता

प्रतिक मिसाळ सातारा

सातारा  राज्‍य सरकारच्‍या सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाने सातारा येथे ६१ वी राज्‍य हौशी मराठी  नाट्य स्‍पर्धा २०२२-२३ ही स्पर्धा सातारा उपकेंद्रावर होत आहे.

नाट्य स्‍पर्धा साताऱ्यातील शाहू कलामंदिर येथे सोमवारी (दिनांक २८ नोव्हेंबर) पासून सुरु होणार आहे. साधारण आठरा वर्षांपूर्वी काही तांत्रिक अडचणींमुळे ही स्पर्धा  सातारा जिल्ह्यात व्हायची बंद झाली होती पुढे सातारा जिल्ह्यातील नाटके पुणे, पिंपरी चिंचवड आणि सांगली केंद्रावर होऊ लागली , परिणामी सातारा जिल्ह्यातील या स्पर्धेतील नाटकांची संख्या रोडावली  आज अखेर ही स्पर्धा सातारा जिल्ह्यात सुरू झालीच नाही. 

सातारा केंद्र या वर्षी पुन्हा सुरू केले जावे यासाठी बाळकृष्ण शिंदे यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे सतत  पाठपुरावा केला आणि सातारा जिल्ह्यातील बहुतांश रंगकर्मींनी ही जिल्ह्यात स्पर्धा झालीच पाहिजे ही एक चळवळ बनवली . सातारा जिल्ह्यातून बारा संघ उभे करून या चळवळीला मोठा पाठिंबा दिला. तुषार भद्रे, राजेश मोरे, कल्याण राक्षे, श्रीनिवास एकसंबेकर यांचा सातारा केंद्र सुरू होण्याच्या या चळवळीत सक्रिय सहभाग आणि पाठींबा होता. तूर्तास ही स्पर्धा सातारा उप केंद्र म्हणून सातारा जिल्ह्यात सुरू होत आहे . आठरा वर्षांनंतर राज्य नाट्य स्पर्धा साताऱ्यात होत आहे याचा आनंद रंगकर्मीं आणि प्रेक्षकांमधून व्यक्त होत आहे. 



स्‍पर्धेला (दि. २८ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी सात वाजता सुरु होणार आहे. यादिवशी चि.त्र्‍य. खानोलकर लिखीत एक शून्‍य बाजीराव या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
दिनांक २९ रोजी चैतन्‍य सरदेशपांडे लिखीत फेन्‍ट, दिनांक १ डिसेंबर रोजी डॉ.समीर मोने लिखित आपुलाची वाद आपणासी,दिनांक २ रोजी शिवाजी देशमुख लिखित बायकोची जात फटाक्‍याची वात, दिनांकब४ रोजी श्रीनिवास एकसंबेकर लिखित अश्‍‍वदा, दिनांक ५ रोजी लक्ष्‍मीकांत विसपुते लिखित कर्फ्‍यू, दिनांक ६ रोजी शिवाजी देशमुख लिखित बदला गं माझा दादला, दिनांक ७ रोजी तुषार भद्रे लिखित गजर, दिनांक ८ रोजी अशोक समेळ लिखित कुसुम मनोहर लेले, दिनांक ९ रोजी बाळकृष्‍ण शिंदे लिखित तीन फुल्‍या तीन बदाम, दिनांक११ रोजी विक्रमसिंह शिवाजी बल्‍लाळ लिखित हिथंच संपला वग, दिनांक १२ रेजी रत्‍नाकर मतकरी लिखित वटवट सावित्री या नाटकाचे सादरीकरण हौशीकलाकार करणार आहेत.

या स्‍पर्धेतील नाटकांसाठी १० आणि १५ रुपये इतके अल्प_शुल्क आकारण्‍यात येणार आहे.

या स्‍पर्धेस सातारकरांनी भरघोस_प्रतिसाद देत कलाकारांना प्रोत्‍साहन देण्‍याचे आवाहन सातारा येथील स्पर्धेचे समन्वयक कल्‍याण राक्षे यांनी सर्व रंगकर्मींच्या वतीने केले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!