सातारा – कराड सातारा जिल्हा रयत क्रांती संघटना व ऊस संघर्ष समिती यांच्यावतीने पहिली ऊस परिषद कोपर्डे हवेली येथे संपन्न झाली माजी कृषी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत व ऊस संघर्ष समितीचे जिल्ह्यासह तालुक्यातील प्रतिनिधी व गावोगावचे सभासद व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी सदाभाऊ खोत यांनी तीन कलमी कार्यक्रम व आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.यामध्ये पहिल्या टप्प्यात कोपर्डी हवेली ते यशवंतराव चव्हाण समाधी स्थळावर पायी मोर्चा काढण्याची निश्चित केले . दुसऱ्या टप्प्यात साखर सम्राट यांच्यावर गोमूत्र टाकण्याचा आणि तिसरा टप्पा नाही ऐकले तर एकही कारखाना चालून देणार नाही वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी घेतली
यापुढे खोत यांनी राज्यकर्ते पक्ष, गट,तट बाजूला ठेवून ऊस दरासाठी शेतकऱ्यांच्या विरोधात एक होतात मग शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या उसाला दर मिळण्यासाठी एक व्हावे शेतकऱ्यांच्या उत्पादनावरती मोठ्या झालेल्या राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. येत्या १४ तारखेला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर जाऊन यांना शेतकऱ्यांचे हक्काची पहिली उचल ३५०० रुपये द्यावा यासाठी नतमस्तक होऊन साकडे घालू असे सांगितले.
रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र सचिव सचिन नलवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्याने रिकवरी प्रमाणे आपले जे दर जाहीर केले आहे कराड तालुक्यातील रयत अथणी साखर कारखाने ने उपपदार्थ नसतानाही पहिली उचल २९२९ जाहीर केली आहे अद्याप इतर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली नाही शासनाच्या जीआर नुसार हंगाम सुरू होण्यापूर्वी चालू वर्षाचा ऊस दर जाहीर करण्याचा व स्थानिक वर्तमानपत्रात जाहीर करणे बंधनकारक आहे हा जीआर कारखानदार सहज मोडतात शेतकऱ्यांनी एकजुटीने काम करावे.
या ऊस परिषदेसाठी राजू शेळके, रोहित जाधव, सुदाम चव्हाण, भरत चव्हाण, अजिंक्य शेवाळे, संजीवन देशपांडे,यास कार्यकर्ते शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ऊस उत्पादक शेतकरी व उपस्थित होते. तसेच अनेक संघटनांनी रयत क्रांती शेतकरी संघटनेला व संघर्ष समितीला पाठिंबा दिला.