Saturday, July 27, 2024
Homeक्राइमसातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची धडाकेबाज कामगिरी

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची धडाकेबाज कामगिरी


एका दिवसात तब्बल २० गुन्ह्यातील ५६ आरोपींवर गुन्हे दाखल..

हेमंत पाटील सातारा
सातारा -साताऱ्याचे नुतन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या समुळ उच्चाटनाची मोहिम हाती घेतली आहे.पोलिस अधीक्षक समीर शेख ॲक्शन मोड मध्ये आल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत तर सामान्य नागरिकांनी समधन व्यक्त केले आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अवैध धंद्यांवर करावी करण्याचा धडाका लावला आहे. गडचिरोली येथून साताऱ्यात बदलून आलेले नवीन एसपी समीर शेख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आता अवैध धंद्यांची उच्चाटनाची मोहिम हाती घेतली आहे. तसेच महामार्गालगतच्या धाबे, हॉटेल्सची तपासणी करून तेथे अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्याची सूचना सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या अवैध कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत २० विविध गुन्ह्यात ५६ आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून दीड लाखांवर अवैध मुद्देमाल व रोकड जप्त करण्यात आली आहे.
त्यामुळे सध्या पोलिसांनी प्रत्येक तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पोलिसांनी २० अवैध जुगार अड्ड्यांवर छापे टाकले आहेत. त्यातून ५६ आरोपींवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ६१ हजार ५९३ रूपयांचे अवैध जुगाराचे साहित्य, रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यातंर्गत १२, शाहुपूरी पोलिस ठाण्यातंर्गत आठ ठिकाणी कारवाई केली.
प्रत्येक तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सातारा शहर पोलीस ठाणे १२ व शाहुपूरी पोलीस ठाणे ८ असे एकुण २० गुन्हे दाखल झाले आहेत. अवैध जुगार धंद्यांवर संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईत एकुण २० गुन्हयांमध्ये ५६ आरोपींचेवर कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यात एकूण १ लाख ६१ हजार ५९३ रुपयांचे अवैध जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे.
तसेच अवैध दारु धंद्यांवर छापे टाकुन दारुबंदी कायद्यान्वये सातारा तालुका पोलीस ठाणे- १,औंध पोलीस ठाणे १, वडुज पोलीस ठाणे ४,बोरगाव पोलीस ठाणे २असे एकुण ७ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अवैध दारु धंद्यांवर संयुक्तरित्या करण्यात आलेल्या कारवाईत ७ गुन्हयांमध्ये एकुण ८ आरोपींचेवर कारवाई करुन त्यांचेकडून एकुण ७४७० रुपयांचा अवैध दारुसाठा जप्त करणेत आलेला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!