Saturday, July 27, 2024
Homeइतरसातारा- जावली तालुक्यातील दुर्गम शाळा निकषाचा घोळ मिटला आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

सातारा- जावली तालुक्यातील दुर्गम शाळा निकषाचा घोळ मिटला आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार

शिक्षक संघटनांनी मानले आभार

प्रतिक मिसाळ सातारा

सातारा – सातारा जिल्हा परिषदेने सातारा आणि जावली तालुक्यातील दुर्गम शाळा घोषित करताना शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तीन निकष न लावता चार निकष लावले आहेत . शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तीन निकष लावावेत तसेच मंडल निहाय पर्जन्यमान गृहीत धरावे , वाहतूक व्यवस्थेबाबत फेर सर्व्हे करावा यांसंदर्भाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याशी चर्चा केली . गौडा यांनी सर्व सूचना मान्य करून लवकरच बदल करण्याचे जाहीर केल्याने सातारा- जावली तालुक्यातील दुर्गम शाळा निकषाचा घोळ मिटला आहे .

सातारा जिल्हा परिषदेने सातारा तालुक्यातील १० तर जावळी तालुक्यातील १८ दुर्गम शाळांची यादी घोषित केलेली आहे . याला अनेक शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता . दुर्गम शाळा घोषित करताना चार निकष लावण्यात आले असून शासनाच्या अध्यादेशानुसार तीन निकष लावून दुर्गम शाळांची वर्गवारी करणे गरजेचे आहे . त्यामुळे हि समस्या सोडवा अशी मागणी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती.आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी आज जिल्हा परिषदेत मुख्याधिकारी गौडा यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली .

यावेळी दीपक भुजबळ , सुरेश जेधे , रघुनाथ दळवी , अनिल चव्हाण , शंकर देवरे , शंकर जांभळे , सुजाता जाधव , तानाजी आगुंडे , सुरेश चिकणे , गणेश शिंदे , धनसिंग सोनावणे , नामदेव जुनघरे , विजय बांदल , संजय कटाळे , जोतिराम जाधव , महेश पडलवार , विकास ढाणे , घनश्याम कदम , सखाराम मालुसरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते . शिक्षकांच्या मागणीनुसार मंडल निहाय पर्जन्यमान गृहीत धरावे , वाहतूक व्यवस्थेबाबत फेर सर्व्हे करावा , दुर्गम भागातील निकष ठरवताना चार ऐवजी शासनाच्या अध्यादेशानुसार तीन लावावेत असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्याधिकारी गौडा यांनीही सकारात्मकता दर्शवून शिक्षकांच्या मागणीनुसार बदल करू , असे सांगितले . यामुळे दुर्गम शाळा निकषाचा घोळ मिटला असून शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे . यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि शिक्षकांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह मुख्याधिकारी विनय गौडा यांचे आभार मानले .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!