प्रतिनिधी हेमंत पाटील सातारा
सातारा – दिनांक १५ मार्च
राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जनआंदोलन उभे केले होते.. या मागणीकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने येत्या ८ दिवसांत वर्षाला २५ ते ३० हजार कोटींचा होणारा घोटाळा बाहेर काढणार असून माझ्याकडे ई डी येऊन गेलीये त्यामुळे मला भीती नाही.
येत्या १५दिवसांत संपूर्ण राज्यात जाऊन व्यापक जनआंदोलन उभे करून या सरकारला गुडघे टेकायला लावून शेतकऱ्याला दिवसा वीज दिल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले आहे.