Thursday, July 25, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?सागरी प्रवासाच्या स्वस्त मार्गातून इंधन बचत

सागरी प्रवासाच्या स्वस्त मार्गातून इंधन बचत

नादरगे चंद्रदीप बालाजी

      आपला भारत देश जगात कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो . निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने भारताला भरभरून सौंदर्य लाभलेलं आहे . झाडे , वेली , पशू - पक्षी , नदया , डोंगर , पर्वत , नद्या समुद्रकिनारा या सर्वांनी भारताची जणु सुंदर सजावटच आपणास पहायला मिळते.रामायणात श्रीरामांना नौकेतूनच पलीकडे किनाऱ्यावर सोडण्याचा उल्लेख आहे.पूर्वी मत्स्यव्यवसायही नौकेतूनच केला जात असे . महाभारतातही द्विपे जिंकण्याचा उल्लेख आढळतो . वास्को - द - गामा यानेही समुद्रकिनाऱ्याची सफर नौकेतूनच केली . सिकंदरने भारतावर समुद्रमार्गाने स्वारी केली . त्या वेळी ज्या नौका वापरण्यात आल्या त्या भारतीय बनावटीच्याच होत्या असे तज्ज्ञांचे मत आहे . भारत भविष्यात अनेक भागांना सहज जोडला जाऊ शकतो व अगदी कमी कमी खर्चात ते शक्य होईल हे छत्रपती शिवाजी महाराजानी ३५० वर्षापूर्वी जाणून त्यांनी नौदलाची स्थापना केली होती . छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरदृष्टीमुळेच आजही सागरी सुरक्षा टिकून आहे . या सध्याच्या युगात शिवरायाप्रमाणेच "जाणता राजा" होणे गरजेचे आहे . 
     राष्ट्रीय महामार्गासाठी  इंधन,पैसा, वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होतो.त्या अनुषंगाने किनारपट्टीच्या भागात सागरी महामार्गाचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल.सुरक्षित जलद अल्पखर्ची प्रवास सागरी मार्गामुळेच होईल.पर्यटकांनाही सागरी मार्गाने प्रवास केल्याचा आनंद मिळेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सागरी किनारपट्टीचा भाग सुरक्षित राहील.सागरांचे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण थांबेल.अशा सागरी प्रवासासाठी आधुनिक बोटींचा वापर केला पाहिजे. अनेक बंदरांची दुरुस्ती करून प्रवाश्यांच्या सुविधाकरिता नियोजन केले पाहिजे.बंदरापासून जवळकज सर्व प्रकारचे साहित्य तुरंत मिळण्यासाठी विविध दुकाने उभारली पाहिजेत.किनारपट्टीच्या भागही विविध रंगबेरंगी फुलझाड,

फळझाडांनी सुंदर सजवला पाहिजे.प्रवाश्यांना ने-आन करण्यासाठी बसेसचा वापर केला पाहिजे.प्रवाशी जहाजबरोबरच मोठ्या प्रमाणात माल वाहतूकही केली पाहिजे.तरच मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल.त्याचबरोबर वेळ आणि पैसाही वाचेल.रस्त्यावरील होणारे अपघात टळतील आणि प्रदूषणातही घट होईल. खऱ्या अर्थाने इंधन वाचविण्याच्या सर्वोत्तम उपाय म्हणजे गरज असेल तेव्हाच गाडी चालवणे.अन्यथा चालत किंवा सायकलवर जाण्याचा पर्याय निवडणे.किंवा दूरच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करणं म्हणजेच यातून इंधनाची बचत होईल.
यासाठी मोठ्या प्रमाणात जलवाहतूक करणे आवश्यक आहे.जलवाहतूक करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करता आल्यास या प्रवासातून इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत करता येईल.परंतु आज परिस्थीती आपणास उलटच पाहायला मिळते .
स्वातंत्र्यानंतर सागरी किनारे तस्करीसाठी मोठया प्रमाणात वापरले जाऊ लागले . भारताचे नाविक दल तितकेसे प्रगत नाही असे भारताच्या सुरक्षेबद्दल नेहमी बोलले जाते . निरीक्षणाअंती सागरी किनारी भाग अस्वच्छ अढळून आला .
वृक्षतोडीमुळे पाणी , हवा हे दोन घटक मोठया प्रमाणात प्रदुषीत झाले आहेत . जलप्रवाहात कारखाण्यातून निघणारा रासायनिक कचरा , मैला , घाण आणि घन कचरा ,रासायनिक खतांचा अति वापर यामुळे नदी नाले व अन्य भुमितील पाणी विषारी झाले आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या प्रदुषणामुळे सागरावर एक नवं आणि मोठं संकट ओढावलं आहे . या प्लस्टिकमुळे पर्यावरणाला तर हानी पोहचतेच अशा कचऱ्यामुळे सागराचे पाणी तर खराब झालेले आहे . परंतु त्यातील बरेच सजीव मरण पावले आहेत आणि त्याच्या मरणाने हे सागराचे पाणी अधिकच दूषित बनले आहे . या शिवाय आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्यही धोक्यात येतं त्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून ऊसाच्या चिपाडापासून अनेक वस्तू तयार करता येतात त्याचबरोबर कागदापासूनही (रद्दी कागद) अनेक मजबुत व टिकाऊ वस्तू बनविता येतात . कागदी पिशव्याचाच वापर करावा. प्लास्टिकच्या पिशव्या टाळाव्यात . भविष्यात हे होणे खूप गरजेचे आहे .
वाढत्या लोकसंख्येमुळे घरगुती सांडपाणी , साबणयुक्त पाणी , भाज्यातील तेलयुक्त पाणी , सेंद्रिय असेंद्रीय पदार्थ अशा प्रकारचे पाणी मोठया प्रमाणात गटारामार्फत नदयात तर नदयामार्फत थेट समुद्रात येत आहे . त्यामुळे होणाऱ्या जलप्रदुषणाने सागरातील सजीवाचे प्रमाण घटत चालले आहे . सागरी भागात अशा दुषीत जलप्रदुषणाने गोठ्या प्रमाणात दुष्परीणाम होत आहे . हे जाणूनच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीनी नदयाची स्वच्छता मोहिम देशभरात राबविली आहे . नदयाचे पात्र नेहमी स्वच्छ असले पाहिजे , याविषयी ‘ मन की बात ‘ कार्यक्रमाद्वारे ते जनतेपर्यंत पोहचले आहेत . त्यांच्या या कार्याला देशभरातूनच साथ मिळाली आहे . अलीकडच्या काळात लोकसंख्या वाढीमुळे प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढलेले आहे . त्यावर आळा बसविण्याचे काम मोदीजीने केले आहे . प्रत्येक देशवासीयांच्या मनात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण केली आहे . मोदीजींच्या या कार्याला शतशः प्रमाण !
गंदगीमुक्त भारत ‘ या उपक्रमांतर्गत आपला देश प्लास्टिकमुक्त व्हावा या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली आहे.या प्लॅस्टिक प्रदूषणामुळे भूमी, नाल्या, नद्या, सागरावर एक नवं आणि मोठं संकट ओढवलं आहे. हे जाणूनच भरताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ‘गंदगीमुक्त भारत’ अंतर्गत उपक्रम स्वच्छता मोहीम सप्ताह देशभरात त्यांनी राबविली आहे. नद्यांचे पात्र तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ असला पाहिजे, या विषयी ‘मन कि बात’ कार्यक्रमाद्वारे ते जनमांनसापर्यंत ते पोहोचले आहेत. त्यांच्या या कार्याला देशभरातूनच साथ मिळाली आहे. अलीकडच्या काळात लोकसंख्या वाढीमुळे प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यावर आळा बसविण्याचे अतिउत्कृष्ट काम मोदिजींनी केले आहे. प्रत्येक देशवाशीयांच्या मनात स्वच्छतेवीषयी जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे यासाठी ‘ गंदगीमुक्त भारत ‘ या उपक्रमांतर्गत भारत देशातील खेडी,वाडी,तांडा,पाटी,वस्ती, गाव,शहर इ.भाग तसेच नाल्या,
कालवे,नद्या स्वच्छ झाल्या तर आपले आरोग्य चांगले राहील.आणि पर्यावरण दूषित होणार नाही.हे जाणूनच समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी जाताना थोडीशी आपण काळजी घेतली पाहिजे . परंतू या २१ व्या शतकामध्ये परिस्थिती या उलटच दिसत आहे . पावसाळ्याच्या दिवसात समुद्राच्या लाटाची मजा लुटण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी किंवा समुद्रकिनारी फिरण्यासाठी अनेक पर्यटक तेथे जातात . “सावधानता बाळगा.” अशा सुचना समुद्र किनाऱ्यावर लिहिलेल्या आहेत असे सांगूनही बरेच लोक समुद्रात बुडून मरून जातात . ही संख्या अलिकडच्या काळात वेगाने वाढल्याचे दिसून येते .
समुद्रकिनारा लाभलेले राज्य म्हणजे गुजरात , महाराष्ट्र , गोवा , कर्नाटक , तामिळनाडू , आंध्र प्रदेश , ओडिसा , पश्चिम बंगाल आणि पांडेचेरी तसेच दिव दमण लक्षद्विप व अंदमान निकोबार इ . तर भारतामध्ये बरेच बंदरे छोटी मोठी आहेत . त्यात गुजरातला एकुण ४० बंदरे आहेत . महाराष्ट्रात 53 बंदरे आहेत . गोव्यात ५ बंदरे आहेत . कर्नाटकात १० बंदरे आहेत . तामिळनाडूमध्ये १५ बंदरे आहेत आंधप्रदेशात१२ बंदरे आहेत . ओडिसामध्ये २ बंदरे आहेत . तर बेटांच्या परिसरात एकूण २३ बंदरे आहेत . भारतासमोर प्रथम सागरी सुरक्षेचे आव्हान आहे . त्याचबरोबर भविष्यात समुद्रकिनारी होणारा व्यापार , मालवाहू बोटीचे संरक्षण , सध्या जगात सर्वत्र कच्या तेलाचे भाव वाढत आहेत . मुंबईच्या परिसरात ” बाम्बे हाय ” आणि किनारपट्टीवर प्रचंड खनिज तेलाचे साठे आहेत . या काळात त्यांचे संरक्षण केले जाणे अत्यावश्यक आहे .
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवासी वाहतूक या दृष्टीने जगातील प्रगत देशाच्या तुलनेत आपण खुपच मागासलेलो आहोत . सागरी मार्गाने होणाऱ्या निर्यातीचे प्रमाणे वाढण्याऐवजी प्रत्येक वर्षी ते घटतच चालले आहे . हा प्रवास आनंददायक कमी खर्चाचा असला तरी जलवाहतूकमध्ये प्रचंड लाटा , वादळ आणि प्रवासाचा वेग यामुळे घटत चालला आहे .
किनारपट्टीचा भाग म्हणजे आता सध्याच्या काळात समाज कंटक आणि देशद्रोही लोकांचा आश्रयस्थान बनला आहे . आतंकवादाचे वाढते आव्हान लक्षात घेऊन त्यांच्यावर कडक नजर ठेवणे आणि त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणे अत्यावश्यक आहे . सुरक्षेचे प्रमाणे वाढले पाहिजे .
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देशच हादरला . या अशा हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खुप मोठया सुरक्षेच्या व अनेक उपाययोजनांची भारतात गरज आहे . या बॉम्ब स्फोटामध्ये ७३१ जनाचा बळी गेला आहे . तर यात ४१ कोटी ७२ लाख मालमत्तेची हानी झाली आहे . शेकडो संसार उद्वस्त झाले .
आंतरराष्ट्रीय पातळीवरील माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक अनेक पटीने वाढविणे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक असल्याने किनारपट्टीवर बंदरे जोडण्यासाठी बारमाही रस्ते , टेलीफोन , मोबाईल नेटवर्क इंटरनेट , सुरक्षा असली पाहिजे . त्याचबरोबर पोलीस सागरी दल , नौदल यांचा पहारा असने गरजेचे आहे . नाशवंत मालाच्या संरक्षणासाठी शितगृहे आवश्यक आहेत , कंटेनरमध्ये माल चढविणे व उतरविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहेत.
भारताच्या सागरी सुरक्षेचा मुद्दा विचारात घेऊन भारतीय नौदल , तटरक्षक दल , सीमा शुल्क विभाग , स्थानिक जिल्हा पोलीस आणि स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या माध्यमातूनच संयुक्त सुरक्षा दल निर्माण करण्यात यावेत . सागरी किनारपट्टीत गस्ती नौकाच्या माध्यमातून संयुक्त सागरी गस्त सुरू करण्यात आली . स्थानिक पोलीसाच्या माध्यमातून ग्रामसुरक्षा दले निर्माण करावीत . किनारपट्टीतील संशयास्पद माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी . एवढेच नव्हे तर सीसीटिव्ही कॅमेरे जागोजागी बसविण्यात यावेत . सागरी भरती रेषेच्या ५०० मीटरच्या आत कोणतीही इमारत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम करू नयेत , यासाठी उपाययोजनांची गरज आहे .
सर्व दलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे . बंदरावर शस्त्रसाठा , सैनिक सेना भरपूर असली पाहिजे . बसस्थानक , रेल्वे स्थानक , विमानतळावर जशी गर्दी असते तसीच गर्दी भविष्यकाळात बंदराच्या ठिकाणीही असली पाहिजे . या स्वस्त मार्गाचा अवलंब करून देशाचा विकास चांगल्या प्रकारे साधता येतो.

( टिप – संबधित लेखकाने आपली मते व्यक्त केली असून त्याच्याशी संपादक मंडळ , व्यवस्थापक सहमत असतील असे नाही.संबधित लेखातील मजकूर व त्या अनुषंगाने संबधित बाबतीत लेखक जबाबदार आहेत.)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!