Friday, July 12, 2024
Homeस्थानिक वार्तासहकाराचा अनुभव नसलेल्यांचा प्रतापगड बाबत कुटील डाव - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सहकाराचा अनुभव नसलेल्यांचा प्रतापगड बाबत कुटील डाव – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

आमदार शशिकांत शिंदे व दीपक पवार यांच्यावर सडेतोड टीका

प्रतिनिधी हेमंत पाटील कराड


सातारा – ७ फेब्रुवारी
जे संस्थेचे साधे सभासदही नाहीत तेच निवडणुकीसाठी जास्त दंगा करायला लागले आहेत, मात्र ज्यांचे कारखाना उभारणीत व उभारणी नंतरही कसेलेही योगदान नाही अशा लोकांनाच निवडणुक आल्यावर कळवळा वाटायला लागला आहे, सभासदांच्या हितासाठी निवडणुक लढवण्याची भाषा करणाऱ्यांच्या मनात कुटील राजकारण लपले आहे, कारखाना हे फक्त निमित्त आहे त्यांना फक्त आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक डोळ्यासमोर दिसत आहे, जर तुम्हाला सभासदांचे हित वाटत होते तर किसनवीरकडून प्रतापगडचा करार मोडण्यासाठी व कारखाना सूरू करण्यासाठी या आधी का पुढकार घेतला नाही याचे उत्तर आधी द्यावे, असा खडा सवाल करत तालुक्याच्या अस्मितेसाठी सभासद शेतकऱ्यांनी संस्थापक पँनेल व सैारभ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे व कारखान्याची निवडणुक बिनविरोध करावी असे मत सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

प्रतापगड सहकारी साखर कारख्यान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असल्याने जावळी तालुक्यातील राजकीय वातवरण चांगलेच तापायला सुरूवात झाली असून संस्थापक पँनेलच्या वतीने जावळीचे उपसभापती सैारभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची तयारी सूरू असतानाच जिल्हा परिषदेचे सदस्य दिपक पवार यांनी कारखाना बचाव पँनेलच्या वतीने निवडणुकीत आव्हाण निर्माण केले असून दोन दिवसांपुर्वीच दिपक पवार यांनी आमदार भोसले यांच्यावर टिका केली होती, आज आमदार भोसले हे जावळी तालुक्यातील बैठकीला आले असता त्यांनी दिपक पवार व आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकेची झोड उठवली, पुढे बोलताना आमदार भोसले म्हणाले, प्रतापगड कारखाना ही जावळी तालुक्याची अस्मिता असून माजी आमदार स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व राजेंद्र शिंदे यांनी अथक परिश्रमातून या संस्थेची उभारणी केली आहे, त्यांच्या पाश्चात सुनेत्रा शिंदे व सैारभ शिंदे यांनी देखील विद्यमान संचालक मंडळाला सोबत घेउन कारखाना सुरळीत चालवण्याचा प्रयत्न केला, आजपर्यंत त्यांच्यावर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत हे म्हत्वाचे असून आर्थिक अडचणीमुळे व नाईलाजास्तव कारखाना किसनवीर कारखान्याला भाडेतत्वावर द्यावा लागला, त्यांनी तो खाजगी तत्वावर न देता सहकारात त्याचे अस्तित्व जिवंत ठेवले, त्यामुळेच सभासदांच्या मालकीचा कारखाना राहू शकला, मात्र जे साधे कारखान्याचे सभासदही नाहीत तेच आज कारखान्याची निवडणुक लढवण्याची भाषा करत आहेत.
ज्यांना सहकारातला काडीचाही गंध नाही, ज्यांच्या स्वाताच्या सहकारी संस्था बालअवस्थेतच बंद पडल्या,त्यांना आज सहकार व सभासंदाचे हित जाणावायला लागले आहे, मी भाजपा मध्ये असलो व सैारभ शिंदे राष्ट्रवादीत असले तरीही स्वर्गीय लालसिंगराव शिंदे व आमच्या घराण्याचे तीन पिढ्यांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत, लोकप्रतिनिधी म्हणून सहकार आणि राजकारण वेगळे ठेवणे गरजेचे असून कारखान्यासाठी सैारभ शिंदे यांच्या पाठीशी मी खंबिरपणे उभा असून त्यांच्याच हातात कारखाना रहावा यासाठी सर्वांनी कारखाना बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बगलबच्चांची सोय करण्यासाठी कारखान्याची निवडणुक लढवण्याचे शडयंत्रजावळीच्या माजी आमदारांच्या कार्यकाळात जावळी दुध संघ बंद पडला व खाजगी दुध संघ सूरू झाला, हे सहकाराला पोषक वातावरण आहे का, असा सवाल उपस्थित करून केवळ आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुक डोळ्यासमोर निवडणुकीचा घाट घातला जात असून, यांना शेतकरी सभासदांचा कसलाही कळवळा नसून, केवळ स्वताची व बगलबच्चांची राजकीय सोय करण्यासाठी कारखान्याची निवडणुक लढवण्याचे शडयंत्र आहे, जावळीतील उस उत्पदकांना उस इकडे नेतो, तिकडे नेतो म्हणनाऱ्यांनी आजपर्यंत किती सर्वसामान्य शेतकऱ्यांचा उस नेला याचा शोध घ्यावा असा उपरोधिक टोलाही आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता भोसले यांनी यावेळी लगावला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!