Monday, June 17, 2024
Homeराजकारणसर्वांना बरोबर घेऊन मतदारसंघात विकासकामे करणार - धैर्यशील कदम

सर्वांना बरोबर घेऊन मतदारसंघात विकासकामे करणार – धैर्यशील कदम

भाजप प्रवेशानंतर कदम यांचे कराड उत्तर मध्ये जोरदार स्वागत

हेमंत पाटील कराड

भाजपा प्रवेशानंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील कदम यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. पुसेसावळी येथील दत्त चौकात फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले.

कराड – अडीच वर्षे सत्ता असताना मुद्दाम आमच्या कार्यकर्त्यांची गळचेपी करणे, मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने आम्ही पोरके झालो होतो. अनेक विकास कामे अडवली होती. मतदारसंघातील विकासकामे ठप्प झाली होती यामुळेच बैचेन होतो. रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मतदारसंघात गटतट न पाहता सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करणार असल्याचे प्रतिपादन वर्धनचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी केले.

वर्धनचे चेअरमन धैर्यशील कदम यांच्या भाजप प्रवेशानंतर पुसेसावळी येथे आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी कराड उत्तरचे तालुकाध्यक्ष महेश जाधव, सागर शिवदास, निलेश माने,पृथ्वीराज निकम,सतीश सोलापुरे,श्रीकांत पाटील, अविनाश साळुंखे,दत्ता साळुंखे,सतीश काळे, महेश पाटील, अकबर बागवान, धनंजय माने,रविंद्र कदम अमोल कदम, दादासो कदम, ज्ञानेश्वर पवार, वसंतबापू यादव,अनिल पिसाळ, नितीन वीर,राजू माळवे, अनिल पवार,अमीर मुलाणी, इस्माईल संदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.भाजपचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ म्हणाले कराड उत्तर मध्ये धैर्यशील कदम यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तर मध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी केले.

कार्यक्रमास प्रल्हाद सूर्यवंशी,आनंदराव कदम,नाना जाधव,रामचंद्र येवले,रामदादा माने, बाळू थोरात,संभाजी थोरवे, बबलू पाटील,अमित जाधव,शशिकांत चव्हाण, अविनाश चव्हाण,अमृत डुबल,विजय घार्गे, प्रकाश सोरटे आणि ग्रामस्थ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!