Thursday, June 20, 2024
Homeइतरसरपंच रमेश गडदे व ग्रामस्थांनी मागील वीस वर्षांपासून डी पिच्या जागेचा सोडवला...

सरपंच रमेश गडदे व ग्रामस्थांनी मागील वीस वर्षांपासून डी पिच्या जागेचा सोडवला प्रश्न

चोरीला गेलेले ट्रान्सफॉर्मर  बुधेवस्ती येथे नवीन जागेत बसवण्यात आल्याने नागरिकांनी केला आनंद व्यक्त

कोरेगाव भिमा – शिक्रापूर (ता.शिरूर)  बुधेवस्ती येथील चोरांनी डी पि चोरून नेली होती तसेच पूर्वी असलेल्या ट्रान्सफॉर्मरची जागा खूप अडचणीची असल्याने वायरमन यांना फ्यूज अथवा लिंक टाकण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने व मागील  वीस वर्षापासून डीपीच्या जागे संदर्भातील अडचण नागरिकांच्या सहकार्याने सोडवत बुधे वस्तीतील नागरिकांनी डी पि साठी जागा उपलब्ध करून दिल्याने  डी पि बसवत मागील वीस वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने व डी पि उपलब्ध करून दिल्याने सर्वांनी सरपंच रमेश गडदे यांचे अभिनंदन केले

 ग्रामीण भागातील ट्रान्सफॉर्मर चोरण्याचा चोरांनी सपाटा लावला असून प्रशासन हतबल तर चोर मालामाल होत आहे. शिक्रापूर येथील बुधेवस्ती ट्रान्सफॉर्मर चोरीस गेल्याचे विद्यार्थी व लहान बालके – महिला भगिनींना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते तर शेतीचे नुकसान होत होते.याबाबत येठी  नागरिकांनी याबाबत शिक्रपुराचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांना कळवले असता त्यांनी तातडीने शिक्रापूरचे अभियंता नितीन महाजन ,उपअभियंता भगवान इधाटे तसेच वायरमन रामदास चव्हाण यांनी ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.

    यावेळी  सत्यवान भुजबळ ,जयवंत भुजबळ ,भानुदास भुजबळ, ह.भ.प काळूराम महाराज भुजबळ, अशोक भुजबळ त्याचबरोबर बुधे वस्ती वरील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व एम एस ई बी चे अधिकारी पदाधिकारी यांचे सर्वांचे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!