आजी माजी पदाधिकारी ,मार्गदर्शक व ग्रामस्थांना हा पुरस्कार समर्पित असून आयुष्यातील अविस्मरणीय पुरस्कार आहे – सरपंच स्नेहल राजेश भुजबळ
कोरेगाव भीमा – दिनांक २० एप्रिल
उद्योगनगरी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या विकासकामांची दखल सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी घेतली असून सणसवाडी ग्राम पंचायतीला राज्यातील ‘आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार’ जाहीर केला असून याबाबत पुरस्कार स्वीकारण्यासाठी शुक्रवार दिनांक २२ एप्रिल रोजी ग्राम विकासाची पंढरी असणाऱ्या आदर्श ग्राम पंचायत हिवरेबाजार ( जि.अहमदनगर) येथे येण्याचे पत्र सरपंच परिषद मुंबई,( महाराष्ट्र ) चे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय काकडे व प्रदेश सरचिटणीस ॲड विकास जाधव यांनी दिले आहे.राज्यातील चार ग्राम पंचायतींना हा पुरस्कार जाहीर झाला असून पुणे जिल्ह्यातील सणसवाडी (ता.शिरूर) व पोंदेवाडी ( ता.आंबेगाव) या दोन ग्राम पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला आहे.
सणसवाडी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेला विकास तसेच ग्राम पंचायत स्थापनेपासून सर्व आजी माजी सरपंच ,उपसरपंच ,ग्राम पंचायत सदस्य , मार्गदर्शक व हितचिंतक यांचे काम व विकासाचा आलेख उंचावत राहिला यामुळे गावाला सन्मानित करण्यात आले असून उद्योगनगरी सणसवाडी गावच्या नावलौकिकाचा डंका महाराष्ट्र राज्यात गरजताना दिसत आहे.आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून ग्राम पंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत असून ग्रामस्थांना विविध सुख सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात.
सरपंच स्नेहल राजेश भुजबळ ,उपसरपंच सागर दरेकर, माजी सरपंच सुनंदा दरेकर, माजी उपसरपंच विजयराज दरेकर,ग्राम पंचायत सदस्य शशिकला सातपुते, सुवर्णा रामदास दरेकर,संगीता हरगुडे, राजेंद्र दरेकर,दत्तात्रय हरगुडे, अक्षय कानडे,दिपाली हरगुडे,रामदास दरेकर,ललिता दरेकर, राहुल हरगुडे,रुपाली दरेकर ,ग्रामसेवक बाळणाथ पवणे,ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थांसहित गावातील सर्व घटकांचा मोठा सहभाग असतो.
सणसवाडी येथील कर्तृत्ववान महिला सरपंच – सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी सरपंच स्नेहल भुजबळ व माजी सरपंच सुनंदा दरेकर यांनी काम केले असून त्यांना सर्व ग्राम पंचायत सदस्यांची मोठी साथ लाभली असल्याने विकासाचा आलेख उंचावण्यास मदत झाली आहे.महिलांच्या हाती सरपंच पदाची सूत्रे पडताच विकासाची घोडदौड मोठ्या प्रमाणात सुरू असून. सणसवाडी ग्रामपंचायत महिला राज म्हणजे विकास पर्व असल्याचे दिसत आहे. महिलांना संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाही हे मूर्तिमंत उदाहरण सणसवाडी गावाने दाखवून दिले आहे.