Saturday, May 25, 2024
Homeइतरसमृद्धी महामार्गावर बस अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर आठ प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर बस अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर आठ प्रवासी जखमी

पुणे – समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर बुलढाणा येथे भीषण अपघाताची एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये बसला आग लागल्याने २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.(A heart-wrenching incident of a horrific accident has come to light at Buldhana on Samriddhi Highway Expressway. Preliminary information is coming out that 25 passengers died while eight passengers were injured due to the bus catching fire in this accident.)

यवतमाळहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसला समृद्धी महामार्गावर अपघातामध्ये बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर आठ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.बसमध्ये एकूण ३३ लोक प्रवास करत होते त्यापैकी २५ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली.

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे.सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

“बसमधून 25 मृतदेह काढण्यात आले आहेत. बसमध्ये एकूण 3pl2 लोक प्रवास करत होते. 6-8 जण जखमी आहेत. जखमींना बुलढाणा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत आहे,” असे बुलढाणा पोलिस उपायुक्त बाबूराव महामुनी यांनी सांगितले.

“25 bodies are extracted from the bus. A total of 32 people were travelling in the bus. 6-8 people are injured. Injured are being shifted to Buldhana Civil Hospital,” said Buldhana Police Deputy SP Baburao Mahamuni.

याबाबत ANI या वृत्तसंस्थेने ट्विट करत माहिती दिली आहे.

https://twitter.com/ANI/status/1674951973274275843?s=20

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!