Sunday, November 3, 2024
Homeताज्या बातम्यामनोज जरांगे पाटील यांच्या खराडीतील सभेसाठी ५० एकर जागा,भव्य स्टेज,  वाहनतळ .......

मनोज जरांगे पाटील यांच्या खराडीतील सभेसाठी ५० एकर जागा,भव्य स्टेज,  वाहनतळ …. सभेची जय्यत तयारी…. 

प्रशासनाकडून वाहतूक बदल,कडेकोट बंदोबस्त, वाघोली येथे जोरदार स्वागत तर सकल मराठा समाजाकडून जय्यत तय्यारी

पुणे – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे निघालेले वादळ आता पुणे जिल्ह्यात येणार आहे. खराडी (ता.हवेली) येथील मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा सोमवारी (ता. २०) नगर रस्त्यावर खराडीजवळील महालक्ष्मी लॉन्सनजीकच्या मैदानावर सकाळी १० वाजता होणार आहे. जरांगे पाटील यांनी राज्यभर दौऱ्याला सुरुवात केली आहे.

पुण्यातील खराडी येथे २० नोव्हेंबर रोजी सकाळी दहाला सभा होणार आहे. या सभेची सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असून मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शना विषयी उत्सुकता शिगेला पोहोचली असून मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार असून भव्य असे २५एकर मनिदान असून २५ एकर वाहन पार्किंग आहे ठिकठिकाणी स्वयंसेवक मदतीसाठी असून खराडी, चंदननगर, वाघोली येथील तरुणाई यामध्ये सहभागी असून सकल मराठा समाजातर्फे योग्य नियोजन व आयोजन करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच सभा असणार आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. खराडी, चंदननगर, वाघोली येथील मराठा तरुणांनी एकत्रित येऊन या सभेचे आयोजन केले आहे. जरांगे पाटील हे १९ नोव्हेंबरला आळंदीत मुक्कामी आहेत. तेथून ते दर्शन घेऊन श्री क्षेत्र तुळापूर येथे येणार आहेत. तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते खराडी येथील सभेला उपस्थित राहणार आहेत. 

अशी असणार सभेची तयारी – भव्य दिव्य स्टेज, सुमारे २५एकरच्या मैदानावर सभा होईल. पार्किंगसाठी सुमारे २५ एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे, कॅमेरे, उत्तम साऊंड व माईक व्यवस्था तसेचक ठिकठिकाणी मदतीसाठी स्वयंसेवक असून सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे.

वाघोलीमध्ये मनोज जरांगे यांचे स्वागत होणार जोरदार – सभेला जाण्यापूर्वी वाघोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्याचे नियोजन वाघोलीतील सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जरांगे यांचे जंगी स्वागत करून सत्कार करण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांच्या सभेला वाघोली व परिसरातील मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाघोली सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे नगर रस्त्यावरील वाहतुकीत बदल – सभेच्या निमित्ताने नगर रस्त्यावरील वाहतुकीत उद्या मोठा बदल करण्यात आला आहे. उद्या दिवसभर नगर रोडवर जड वाहतुकीस पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.

नगर रस्त्यावरून पुण्यात येणारी सर्व वाहने हडपसरच्या बाजूने वळवण्यात येणार आहे. हडपसर सासवडकडून साताऱ्या कडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी सोलापूर रोड मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

शिक्रापूर येथून पुणे शहराकडे येणारी वाहने चाकण भोसरी मार्ग वापरत पुणे मुंबईकडे जाणार आहेत. तर खराडी बायपासवरून जुना पुणे मुंबई रोडवरील वाहने हडपसर मार्गे पुण्यात जाणार आहेत. 

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!