Saturday, November 9, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी वि.वि.कार्य.सह. सोसायटीच्या चेअरमनपदी पारूबाई दरेकर तर व्हॉईस चेअमनपदी वैभव यादव यांची...

सणसवाडी वि.वि.कार्य.सह. सोसायटीच्या चेअरमनपदी पारूबाई दरेकर तर व्हॉईस चेअमनपदी वैभव यादव यांची बिनविरोध निवड

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पारूबाई देवराम दरेकर  तर व्हॉईस चेअरमनपदी वैभव यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांचा सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

चेअरमन काळूराम दरेकर व व्हॉईस चेअरमन भाऊसाहेब दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने संबधित जागी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी  सोसायटीचे सचिव लोहार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

    यावेळी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन पारुबाई दरेकर, व्हॉईस चेअरमनपदी वैभव यादव तर तज्ञ संचालकपदी विनायक हरगुडे, हनुमंत हरगुडे यांच्या बिनविरोध निवडीबाबत ग्राम पंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला.

  यावेळी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर,मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी सभापती मोनिका हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, माजी सरपंच सुरेश हरगुडे, माजी सरपंच अजित दरेकर , माजी चेअरमन सुहास दरेकर, माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर, शिवाजी दरेकर , माजी चेअरमन कैलास दरेकर, माजी व्हॉईस चेअरमन गणेश कानडे मान्यवर  उपस्थितीत होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!