भागातील विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित कलासासारखीच सुविधा मिळत असल्याने ५ वी ते १२ च्या क्लास साठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठी गर्दी केली होती. उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षकवृंद. प्रत्येक विषयासंबंधी तज्ञ शिक्षकांचे वैयक्तिक पूर्णवेळ मार्गदर्शन, विषयानुरूप अद्ययावत नोट्स,प्रश्नसंच व टेस्ट , प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र कौंसलिंग, स्पर्धा परीक्षा ,नीट या परीक्षांची ८ वी पासून सर्वांगीण तयारी करून घेणार असल्याने सणसवाडी सारख्या गावात शहरातील नामांकित क्लासच्या सुविधा मिळत असल्याने पालक व विद्यार्थी आनंदात असून मोठ्या प्रमाणात प्रवेशासाठी गर्दी करताना दिसत आहेत.
विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी क्लास सुरू करण्यात आल्याचे क्लासचे संस्थापक अमोल दरेकर यांनी सांगितले.
आई वडिलांच्या संस्कारामुळे व शिस्ती मुळेच आज माझे करियर घडवू शकलो. अभ्यास करून मार्क्स मिळवणे याचबरोबर इतर क्षेत्रात आपण आपला ठसा उमटवून नावलौकिक मिळवला हवे.आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जात आपण , राग, चीड ,अपयश यांच्यावर मत करत उज्वल आयुष्य घडवायला हवे.शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्यात आहे या जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही त्यासाठी मेहनत ,जिद्द ,सातत्य व नम्रता आवश्यक आहे . – पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे