Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथे सरस्वती आटा मिलला अचानक लागली आग...

सणसवाडी येथे सरस्वती आटा मिलला अचानक लागली आग…

अग्निशमन दलाला पाचारण केले पण वेळेत मदत मिळत नाही मग आग नियंत्रणात आणायची कशी, आमदार अशोक पवार यांच्या  सतर्कतेने अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या तातडीने

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील सरस्वती मिलला सायंकाळी साडे पाचच्या सुमारास अचानक आग लागली असून. आग नियंत्रणात आणण्यासाठी वाघोली,रांजणगाव व शिरूर येथील अग्निशमन दलाला संपर्क साधला असता वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही तोपर्यंत नागरिकांच्या सतर्कतेमुळे बऱ्यापैकी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

     सणसवाडी गावात अगदी पुणे नगर महामार्गाच्या जवळच असणाऱ्या सरस्वती मिलला आग लागल्याचे लक्षात येताच संबधित ठीअंनी नागरिकांनी धाव घेत बचाव कार्य सुरू केले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.यावेळी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रा.अनिल गोटे यांनी वेळेत पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिल्याने आग नियंत्रणात आणणे सोपे झाले.वाघोली,रांजणगाव व शिरूर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यासाठी  संपर्क केला असता वेळेवर अग्निशमन दलाच्या आग नियंत्रण गाडी व पथक वेळेवर उपलब्ध झाले नाही मात्र एक दीड तासानंतर अग्नी शमन दलाच्या गाड्या मदतीसाठी पोचल्या

सरस्वती मिलला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर,उद्यजक रामदास दरेकर,  माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, माजी उपसरपंच सागर दरेकर, रवींद्र जूनवणे सुभाष दरेकर, प्रकाश जाधव,रमेश चौधरी, सरस्वती मिलचे इन्चार्ज महेशकुमार सिंधी, राजेंद्र शर्मा व स्थानिकांनी मदत केली.

आमदार अशोक पवार यांचा फोन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने धावल्या सणसवाडीकडे–   सणसवाडी येथील नागरिकांनी आमदार अशोक पवार यांना संपर्क साधत सणसवाडी येथील सरस्वती आटा मिलला आग लागल्याचे कळवले व अग्निशमन दलाला संपर्क साधला असता गाड्या वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या बाबतीत सांगताच आमदार अशोक पवार यांनी व त्यांचे  स्विय सहाय्यक प्रदीप जाधव यांनी तातडीने संपर्क साधत अग्निशमन दलाच्या गाड्या सणसवाडी येथे पोचल्या.

बघ्यांची गर्दी आणि पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांची तत्परता – सणसवाडी येथे आज लागल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना कळताच त्यांनी तातडीने पोलीस मदत पाठवली व स्वतः सर्व परिस्थिती हाताळत सर्वांशी संपर्क ठेवत मदत कार्य व पोलीस बंदोबस्त काटेकोर ठेवला.

     आग लागल्याची पाहण्यासाठी आलेल्या बघ्यांमुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत होता. यावेळी पोलिसांनी अग्निशमन दल व स्थानिकांना मदतीसाठी घेत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!