Thursday, July 25, 2024
Homeस्थानिक वार्तासणसवाडी येथे संजीवनी ग्राम संघाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम विधवांचा सत्कार...

सणसवाडी येथे संजीवनी ग्राम संघाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम विधवांचा सत्कार करत अनोख्या पद्धतीने साजरा

नव संजीवनी ग्राम संघाच्या वतीने आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमास उपस्थित महिला भगिनी

कोरेगाव भीमा – दिनांक ३ फेब्रुवारी

सणसवाडी ( ता.शिरूर) महाराष्ट्र राज्य जीवन्नोती उमेद अभियानातंर्गत सणसवाडी येथील नवसंजीवनी ग्राम संघाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी महिलांना आरोग्य व आर्थिक बचत याचे मार्गदर्शन करण्यात आले होते.

यावेळी एक आगळा वेगळा सोहळा म्हणजे विधवा महिलांचा सन्मान करण्यात आल्याने एक सुखद अनुभव महिलांना अनुभवयास मिळाला त्यामुळे समाजात एक सकारात्मक वैचारिक बदल होताना दिसला .यावेळी उपस्थितांना गुलाबाच्या फुलाची रोपटे संक्रांतीचे वान म्हणून वाटण्यात आले.

सभापती मोनिका हरगुडे यांनी आर्थिक बचत व आरोग्याविषयी काळजी घेण्याबरोबरच आर्थिक सक्षमता हा कुटुंबाचा मोठा आधार असतो यासाठी महिलांनी बचत केल्यावर त्या बचतीचे योग्य नियोजन करून कुटुंबाचा आर्थिक विकास घडवून आणायला हवा असे मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजर यांनी महिलांना झिरो बँलंन्स व विमा याविषयी मार्गदर्शन केले यावेळी सभापती मोनिका हरगुडे , सरपंच स्नेहल भुजबळ , माजी सरपंच सुनंदा दरेकर व ग्राम पंचायत सदस्य शशिकला सातपुते , सुवर्णा रामदास दरेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

माजी सरपंच सुनंदा दरेकर यांनी महिला ग्राम संघाच्या कार्यक्रमासाठी कार्यालय उपलब्ध करून देण्याबरोबरच महिलांना विविध तज्ञांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न करू व महिलांना विविध गृहोदयोग व व्यवसाय प्रशिक्षणात मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

ग्राम पंचायत सदस्या सुवर्णा रामदास दरेकर यांनी कोरोना काळात व इतर कारणांमुळे आपण आपले आप्तेष्ट यांना गमावले असून दुर्दैवाने काही भगिनींना वैधव्य आले . यामुळे आपण त्यांना सन्मानाची वागणूक देत शुभ कार्यक्रमात त्यांना आदराचे आणि मनाचे स्थान दिले पाहिजे. आपण आपल्या भगिनिंचा सत्कार करत त्यांना दुःखातून सावरण्यासाठी मदत केली पाहिजे असे विचार मांडताच काही विधवा महिलांचा तात्काळ सत्कार करण्यात आल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली व या नव उपक्रमाचे सर्वांकडून सहर्ष स्वागत व कौतुक करण्यात आले.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच स्नेहल भुजबळ यांचा सभापती मोनिका हरगुडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी सभापती मोनिका हरगुडे , सरपंच स्नेहल भुजबळ, माजी सरपंच सुनंदा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य शशिकला सातपुते,सुवर्णा दरेकर , रुपाली दरेकर , समन्वयक सोनल सोनोने ,सी आर पि अंजना सोनवणे, नवसंजीवनी ग्राम संघाच्या अध्यक्षा मीनाक्षी हरगुडे ,सचिव मनीषा घोडके, कोषाध्यक्ष आशा भांगे , मासाहेब जिजाऊ ग्राम संघाचे अध्यक्ष नयना हरगुडे, सचिव प्रियंका कानडे ,सुनीता दरेकर व इतर महिला भगिनी उपस्थित होत्या.

हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच स्नेहल भुजबळ यांचा सत्कार करताना महिला भगिनी
हळदी कुंकू कार्यक्रम प्रसंगी सभापती मोनिका हरगुडे ,अध्यक्ष मीनाक्षी हरगुडे, कोषाध्यक्ष आशा भांगे ,सुनीता दरेकर व इतर महिला भगिनी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!