Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सणसवाडी येथे शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

साडेतीनशे नागरिकांना उपक्रमाचा फायदा,रेशनिंग व इतर शासकीय कामे एकाच दिवशी पूर्ण

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व ग्राम पंचायत सणसवाडी यांच्या माध्यमातून शासन आपल्या दरी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागरिकांनी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमात रेशनिंग कार्ड,नाव लावणे , दुबार कार्ड, व सेवा एकच ठिकाणी मिळाल्याने आबालवृद्धांनी या उपक्रमाचा मोठा लाभ झाल्याने आनंद व्यक्त केला तसेच शासन आपल्या दारी या उपक्रमामध्ये महिलांचा विशेष सहभाग दिसून आला.

यावेळी शासन आपल्या दरी कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना उत्पनाचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर,भूमिहीन असल्याचा दाखला,तहसिलदार रहिवाशी दाखलाप्रतिज्ञापत्र,कास्ट व्हॅलिडिटी SEBC ( १६ % मराठा आरक्षण),डोमिसाईल,जातीचा दाखला EWS सर्टिफिकेट,शॉप ऍक्ट लायसन्स,भाडेकरार,E-GAZZET, पोलीस वेरिफिकेशन, अधिवास राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,३०% महिला आरक्षण, अल्पभूधारक दाखला, संजय गांधी योजना, स्कॉलरशिप फॉर्म MAHA.DBT, अपंगासाठी स्वावलंबन कार्ड, नवीन वीज जोडणी अर्ज, एल आय सी,गाड्यांचे इन्सुरेंस व इतर सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना मोठा फायदा झाला तर या उपक्रमात साडे तीनशे नागरिकांना याचा फायदा झाला असल्याची माहिती सरपंच सुवर्णा दरेकर यांनी दिली.

यावेळी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर सरपंच, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, संगिता नवनाथ हरगुडे, स्नेहल राजेश भुजबळ,ग्राम पंचायत सदस्याशशीकला सातपुते, रुपाली दरेकर, ललिता दरेकर, तनुजा दरेकर कु. निकिता हरगुडे,माजी उपसरपंच विजयराज दरेकर, सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर , अक्षय कानडे, मोहन हरगुडे, राहुल हरगुडे, मोहन हरगुडे व ग्राम विकास अधिकारी बी.एच.पवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले महिला ग्राम संघाच्या मीनाक्षी हरगुडे व इतर नागरिक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाबाबत प्रचार व प्रसार करत नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सणसवाडी ग्राम पंचायतीच्या सर्व कर्मचारी वृंदाने मोठी मोलाची मदत केली.

शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना फायदा मिळावा तसेच त्यांची शासकीय कामे व्हावीत व त्याचा सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. – सरपंच सुवर्णा रामदास दरेकर,सणसवाडी ग्राम पंचायत

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!