Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथे मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी कडकडीत बंद

सणसवाडी येथे मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी कडकडीत बंद

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे सकाळ मराठा साजाच्या वतीने कडकडीत बँडच्या आवाहनाला सकारात्मक व परिणाम कारक प्रतिसाद मिळाला असून सणसवाडी  येथील व्यापारी व ग्रामस्थ यांनी कडकडीत बंद पाळला आहे.

    सणसवाडी येथील सकल मराठा समाजाच्या कडकडीत बंदच्या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला असून शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी येथून मिळालेला कडकडीत बंद प्रतिसाद मराठा आंदोलनास ऊर्जा देणारा व प्रेरणा देणारा असून यामध्ये सणसवाडी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहे.

 या बंदमध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शरद गवारे, उपाध्यक्ष संतोष मुथा, सचिव अशोक करडे, खजिनदार अशोक ढेकळे बारामतीकर, अल्ताफ इनामदार दिनेश गुंदेच्या, प्रविण गुंदेचा, रमेश चौधरी, नारायण मारुती दरेकर, आसाराम चौधरी,  विश्वासराव कवडे, नवोपतलाल मुथा, सलीम खान,खुशबू भाभी ,नंदकुमार चवरे, विठ्ठल दरेकर, गणेश साळवी, शोभा गुडदरे ,बालाजी चंदनशिवे या व्यापाऱ्यांसह इतरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!