कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर)
भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक झाला आहे. भारताचे महान रत्न आपल्यातून गेल्याने दुःख ग्रामीण भागात दिसत असून त्याबाबत दुःखद शोक व्यक्त करण्यात येत आहे.
सणसवाडी ग्राम पंचायतीच्या वतीने भारतरत्न , गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजातील गाणी ,देशभक्तीपर गीते व मेरी आवाज ही मेरी पहचान है या लतादीदींच्या हृदयस्पर्शी आवाजातील गाण्यांना ऐकून सणसवाडी ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
तसेच सणसवाडी येथील मध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथे पत्रकार अमोल दरेकर यांच्या संकल्पनेतून व सरपंच स्नेहल भुजबळ यांच्या सौजन्याने भारतरत्न लता मंगेशकर यांची दहा बाय दहाची थ्री डी रांगोळी साकारण्यात आली.
लता मंगेशकर यांची आखीव ,रेखीव व अत्यंत हृदयस्पर्शी रांगोळी सोमनाथ यांनी काढली असून रांगोळी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांनीही मोठी गर्दी केली होती.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी प्रांगणात प्रास्ताविक प्राचार्य बाबासाहेब गोरे, श्रद्धांजली सरपंच स्नेहल भुजबळ, माजी सरपंच सुनंदा दरेकर, उपसरपंच सागर दरेकर ,शालेय शिक्षण समितीचे अमोल दरेकर , ,माजी उपसरपंच ॲड विजय राज दरेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
श्रीमती अडसूळ यांनी शास्त्रीय संगीततील भूप रागावर ‘अखेरचे तुला दंडवत’ हे गाणे पेटीवादन करत स्वरमय श्रद्धांजली वाहिली.
यावेळी संस्थेचे सचिव बाबासाहेब साठे,सावता संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ , ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर ,संगीता हरगुडे, रुपाली दरेकर ,दगडू दरेकर ,नवनाथ हरगुडे, उद्योजक नवनाथ दरेकर , राजेश भुजबळ, रामदास नाना दरेकर , उपस्थित होते.