Friday, June 21, 2024
Homeक्राइमसणसवाडी येथे बंद पडलेल्या कंटेनरला मागून धडकून टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

सणसवाडी येथे बंद पडलेल्या कंटेनरला मागून धडकून टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू

कोरेगाव भीमा- सणसवाडी (ता.शिरूर) येथील पहाटे पावणे सहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला असून बंद पडलेल्या कंटेनरला मागून धडकल्याने टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून टेम्पोच्या पुढील भागाच्या भाग तुटला असून पुढची कॅबिन पूर्णपणे तुटली आहे.(A tempo driver died on the spot after hitting a closed container at Sanswadi)
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणपत महिपत कड (वय-५५ वर्षे) रा.नायगाव, ता. पुरंदर जि. पुणे सध्या रा. कानडे हांसींग सोसायटी हांडेवाडी पुणे यांनी फिर्याद दिली असून फिर्यादी नुसार मिळालेली माहिती प्रमाणे अशोक लेलंट टेम्पो नं. एम एच १२ यू एम १९९९ चालक सुनिल राजाराम कोळपे (वय ४२ वर्षे) रा. जळगाव हे अहमदनगर मार्गे पुण्याला जाता असताना सणसवाडी गावचे जवळ नगर पुणे रोडवर कंटेनरएम एच २१ बी एच १४१६ याला पाठिमागून धडकल्याने झालेल्या अपघातात राजाराम कोळपे (वय ४२ )वर्षे यास गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला.(A tempo driver died on the spot after hitting a closed container at Sanswadi
)
या बाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार बनकर तपासी अमलदार पखाले तपास करत आहेत.(Accident)

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!