Friday, May 24, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा

सणसवाडी येथे प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरा

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते श्रींची आरती

कोरेगाव भिमा –  आयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्री रामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त  उद्योगनगरी सणसवाडी (ता.शिरूर) सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

   यावेळी सणसवाडी श्रींच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.अखंड श्रीराम धुन, महायज्ञ, भव्य मिरवणूक व दिपोत्सव  साजरा करण्यात आला.पालखीपुढे टाळमृदुंगाचा गजर, पारंपरिक वाद्य,बँडबाजा, डी. जे व  स्वागतासाठी महिला भगिनींनी ठिकठिकाणी काढलेली  रांगोळी ,महिला भगिनींनी परिधान केलेला पारंपरिक वेशभुषा व लक्षणीय उपस्थिती यामुळे हा सोहळा आगळा वेगळा ठरला.

   सकाळी पहाटे श्रींचा अभिषेक, महापुजा व होमहवन, चक्रीभजन, अयोध्या येथील लाईव्ह प्रेक्षपण, भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर  ह.भ.प. सोपान महाराज कनेरकर यांचे सुश्राव्य किर्तन झाले त्यानंतर सायं. ७.३० वा दिपोत्सव व फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली.उपस्थित भक्तांना महाप्रसाद  आला यानंतर रात्र जागर करण्यात आला.

आमदार अशोक पवार यांच्या हस्ते श्रींची आरती – पालखी सोहळा भैरवनाथ मंदिरात आल्यानंतर  आमदार अशोक पवार यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

  यावेळी सणसवाडीच्या सरपंच रूपाली दगडू दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी उपसरपंच युवराज दरेकर  रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व माजी उपसरपंच  विजयराज दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर, माजी उपसरपंच सागर दरेकर, माजी उपसरपंच दत्तात्रय हरगुडे ,रामदास  दरेकर, नामदेव दरेकर, माजी सरपंच सुनंदा दरेकर, माजी सरपंच स्नेहल भुजबळ माजी सरपंच संगीता हरगुडे, माजी सरपंच सुवर्णा दरेकर, ग्रामपंचायत सदस्या शशिकला सातपुते, ललिता दरेकर , तनुजा दरेकर, ग्रामपंचायत सदस्य  अक्षय कानडे ,राहुल हरगुडे मोहन हरगुडे, माजी सरपंच सुरेश हरगुडे,गोरक्ष दरेकर, नवनाथ हरगुडे, गोरक्षनाथ भुजबळ दगडु दरेकर अनिल दरेकर, निलेश दरेकर, प्रशांत दरेकर, सुभाष दरेकर, नवनाथ दरेकर, नवनाथ भुजबळ व मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!