सणसवाडी (ता. शिरुर) येथील अमोल हरगुडे यांनी काही दिवसांपूर्वी सतीश दरेकर यांना काही जागा विक्री केली होती, त्यावेळी दरेकर यांनी हरगुडे यांच्या काही जागेमध्ये अतिक्रमण केल्याने हरगुडे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
तर सदर तक्रारीचा राग मनात धरून अमोल हे त्यांच्या एम एच १२ टी के ५११७ या कार मधून चाललेले असताना सतीश दरेकर, आकाश दरेकर व विकास दरेकर यांनी अमोल यांना अडवून शिवीगाळ, दमदाटी करत लोखंडी गज, फावडे तसेच हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली तर यावेळी झालेल्या मारहाण मध्ये अमोल यांच्या गळ्यातील आठ तोळे वजनाची सोन्याची चैन देखील पाडून गहाळ झाली.
याबाबत अमोल काळूराम हरगुडे (वय ३९ वर्षे रा. काळूबाई नगर सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सतीश देवचंद दरेकर, आकाश शांतीलाल दरेकर व विकास शांतीलाल दरेकर (तिघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रविकिरण जाधव हे करत आहे.