Friday, May 24, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षणाचा अभूतपूर्व जल्लोष

सणसवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने मराठा आरक्षणाचा अभूतपूर्व जल्लोष

  • मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील पंतप्रधान – माजी संचालक दत्तात्रय हरगुडे
  • फटाकड्यांची आतषबाजी , भंडाऱ्याची उधळण केली तर महिला भगिनींनी फुगाड्या खेळत केला आनंद साजरा करत एकमेकांना पेढे भरवत छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी दुमदुमून गेला सणसवाडी परिसर.
  • महाराष्ट्रातील मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्या एकमेव आमदार पत्नी सुजाता पवार – सुनीता दरेकर

कोरेगाव भिमा -सणसवाडी (ता. शिरूर) एकतर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल अन्यथा माझी अंतयात्रा निघेल,मराठा आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त करत असंख्य मराठा बांधवांसह भगवे वादळ घेऊन मुंबई स्वारी करून मराठा आरक्षण मिळवत विजयी पताका फडकावत सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा व मागण्यांचा अध्यादेश घेतल्याने महाराष्ट्रात मराठा बांधवांनी एकच विजयी जल्लोष व आनंद साजरा केला.(Manoj Jarange patil)

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी सणसवाडी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने फटाकड्यांच्या आतषबाजी करत भंडाऱ्याची उधळण केली तर महिला भगिनींनी फुगाड्या खेळत केला आनंद साजरा करत छत्रपती शिवाजीराजे की जय..छत्रपती संभाजी महाराज की जय.. एक मराठा ..लाख मराठा अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून सोडत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. (Maratha Reservation)

मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील हे पंतप्रधान – दत्तात्रय हरगुडे सकाळी टी व्हीवर वर पाहिले की व्हावे तर जरांगे पाटीलांसारखे व्हावे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणाचीही वाट पाहत नाही पण मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या मोर्चासह जात असताना मुख्यमंत्र्यांना अर्धा तास वाट पाहावी लागली म्हणून मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे पंतप्रधान आहेत.मनोज जरांगे पाटील यांचे नगर ते पुणे स्वागत सणसवाडी सारखे कुठे झाले नसून याची नोंद त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली.हे चळवळीतील मागील वीस वर्षांपासून काम करणारे नेतृत्व आहे.
गावगाड्यातिल मराठा समाज सर्व समाजाला सोबत घेऊन चाललेला आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रात मंडल आयोग लागू केला व मराठा समाज देणारा आहे.शरद पवार यांनीही सर्व समाजाला दिले आहे इतर राज्यांनी मंडल आयोग लागू केला नाही असे उद्गार काढले.

महाराष्ट्रातील मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्या एकमेव आमदार पत्नी सुजाता पवार – ग्राम पंचायत सदस्या सुनीता दरेकर
सकल मराठा समाजाचा आरक्षणासाठी निघालेला मोर्चा अनेकांच्या मनात धडकी भरवत होता.राजकीय मंडळी यामध्ये सावध भूमिका घेत होत्या त्यावेळी महाराष्ट्रातील एकमेव आमदार पत्नी व माजी सभापती जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी उघड सहभाग घेत, मराठा आंदोलनासाठी उपोषण केले व मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही कृतियुक्त पाठिंबा देणाऱ्या एकमेव आमदार पत्नी असल्याचे उद्गार ग्राम पंचायत सदस्या सुनीता दरेकर यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी संचालक दत्तात्रय हरगुडे व ग्राम पंचायतीचे उपसरपंच राजेंद्र दरेकर, काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव ,सरपंच रुपाली दगडू दरेकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल हृदयस्पर्शी व स्फूर्तिदायक भाषण केले. यावेळी माजी संचालक दत्तात्रय हरगुडे यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा मंडल यावेळी उद्योगनगरी सणसवाडीच्या सरपंच रूपाली दगडू दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी उपसरपंच युवराज दरेकर , माजी चेअरमन सुहास दरेकर, माजी उपसरपंच संभाजी साठे, माजी उपसरपंच सागर दरेकर, काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव,रामभाऊ दरेकर, माजी सरपंच सुनंदा दरेकर, माजी सरपंच स्नेहल राजेश भुजबळ, माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, ग्रामपंचायत सदस्या शशिकला सातपुते, ललिता दरेकर , तनुजा दरेकर, निकिता हरगुडे ,सुनिता दरेकर, , विठ्ठल दरेकर अशोक हरगुडे, सतीश दरेकर, गोरक्षनाथ भुजबळ, दगडु दरेकर, अनिल दरेकर, निलेश दरेकर, प्रशांत दरेकर, सुभाष दरेकर, बाळासाहेब दरेकर,नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे, संतोष शेळके अशोक करडे, पंढरीनाथ गोरडे व मोठ्या प्रमाणात महिला भगिनी ,अबालवृद्ध व नागरिक व आजी , माजी पदाधिकारी, विविध संघटनेचे कार्यकर्ते व मराठा बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!