Thursday, July 25, 2024
Homeस्थानिक वार्तासणसवाडी येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते झेंडा फडकावत अमृत महोत्सवाची अनोखी सुरुवात

सणसवाडी येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते झेंडा फडकावत अमृत महोत्सवाची अनोखी सुरुवात

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सुरुवात ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झेंडा वंदन करत अनोखी सुरुवात करण्यात आली.
वर्षभर ग्रामस्थांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणारे कर्मचारी हे उन ,वारा ,पाऊस यांची तमा न बाळगता दिवसरात्र कामासाठी कार्यतत्पर असतात. तसेच कोरोना काळात जीवाची पर्वा न करता जनतेच्या सेवेसाठी काम करणाऱ्या ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले याची जाण राखत सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर , ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक बाळनाथ पवने यांनी ग्राम पंचायत कर्मचारी एकनाथ शंकर गाडे , विष्णू शंकर गोसावी ,संभाजी परशुराम दरेकर , संभाजी भक्तीराम दरेकर, सोनबा गोविंद शिंदे , गौतम लक्ष्मण चव्हाण, अनिता कैलास पगारे, रेखा काळूराम हरगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करत अनोखा उपक्रम राबवल्याने ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, राजेंद्र दरेकर,रुपाली दगडू दरेकर,ग्रामसेवक बाळनाथ पवणे ,गावकारभारी बबन कान्होजी हरगुडे,नवनाथ हरगुडे ,दगडू दरेकर ,कीर्ती नारायण दरेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते
.

सणसवाडी येथील ग्राम पंचायत कार्यालयाचा ध्वजारोहण करताना ग्राम पंचायत कर्मचारी
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!