Friday, July 12, 2024
Homeक्राइमसणसवाडी येथे गॅस स्फोटात घर… संसारोपयोगी साहित्य व लग्नाचा बस्ता जळाला

सणसवाडी येथे गॅस स्फोटात घर… संसारोपयोगी साहित्य व लग्नाचा बस्ता जळाला

सुदैवाने जीवित हानी नाही..नरके कुटुंबीयांशी आमदार अशोक पवार यांनी संवाद साधत दिला आधार

शिरूर तहसीलदारांना तातडीने पंचनामा करत शासकीय मदत देण्याच्या सूचना

नरके कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आवाहन – आमदार अशोक पवार युवा मंचाच्या वतीने पंडित दरेकर, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे व सरपंच सुवर्णा दरेकर यांनी केली अर्थिक मदत

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील नरके वस्तीवर रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक गॅस चा भडका होऊन राजाराम दत्तात्रय नरके यांचे घर जळाले असून झालेल्या संसारोपयोगी वस्तू व मुलीच्या लग्नातील बस्ता यामध्ये जळाला असून नरके कुटुंबीयांशी आमदार अशोक पवार यांनी संवाद साधत कुटुंबीयांना धीर दिला असून काळजी करू नका. काही मदत लागल्यास कळवा आम्ही तुमच्यासोबत आहोत असा आधार दिला असून शिरूर तहसीलदारांना सदर घटनेचा पंचनामा तातडीने करून नरके कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना आमदार अशोक पवार यांनी केल्या .

सणसवाडी येथील नरके वस्तीवर रात्री साडेनऊच्या सुमारास राजाराम दत्तात्रय नरके यांच्या घरी स्वयंपाक करताना गॅसचा अचानक भडका झाला यात रोहिनि या थोडक्यात बचावल्या,आगीच्या tivratene घरातील वस्तूंना आग लागली यावेळी आगीची तीव्रता पाहून सर्व कुटुंबीय बाहेर आले पण संसारोपयोगी वस्तू, लग्नाचा बस्ता,घरातील इतर वस्तू जळाल्याने कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

गॅस स्फोटामध्ये माळवादी घर पूर्णपणे जळाले असून घराची वासे,आढे जळाल्याने कौले खाली पडली आहेत तर भिंतीही काळवंडल्या आहेत यात नवदाम्पत्याचे संसारोपयोगी साहित्य व लग्नाचा बसता जळाला असून सदर आग विझविण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला.
सदर दुर्घटनेबाबत सणसवाडी ग्रामस्थांना कळताच त्यांनी तातडीने भेट दिली.यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर यांनी नरके कुटुंबीयांना आधार देत काळजी करू नका असे सांगत याबाबत तातडीने आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधून सदर घटना कळवली यावर आमदार पवार यांनी राजाराम नरके व कुटुंबीयांशी संपर्क करत काळजी करू नका.आम्ही सोबत आहोत, सर्व कुटुंबीय व्यवस्थित आहे ना ? अशी काळजीने चौकशी करत काही लागल्यास कळवा आम्ही आहोत असे सांगत नरके कुटुंबीयांना धीर दिला. तसेच सदर घटनेचा तातडीने पंचनामा करत नरके कुटुंबीयांना तातडीने शासकीय मदत करण्याच्या सूचना आमदार पवार यांनी केल्या .

नरके कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आवाहन –
सणसवाडी येथील राजाराम दत्तात्रय नरके हे गरीब कुटुंब असून त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच असून गॅस स्फोटात घरचं जळाल्याने त्यांना मदतीची अवशक्यता असून दानशुरांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे.
आमदार अशोक बाप्पु पवार युवा मंच यांच्यावतीने पंडित दरेकर यांनी आकरा हजार रुपये, मार्केट कमेटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे यांच्याकडून अकरा हजार रुपये तर सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांच्याकडून पाच हजार रुपये, उद्योजक सलीम खान यानं एकविसशे अशी मदत करण्यात आली असून मदतिचा ओघ नरके कुटुंबीयांकडे सुरू करण्यात आला आहे.
तसेच ज्यांना जी शक्य होईल ती मदत करण्याचे आवाहन पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे व सरपंच सुवर्णा दरेकर यांच्याकडून करण्यात आले आहे.
यावेळी उद्योगनगरी सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा रणाडास दरेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, शिरूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वैभव यादव, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, माजी सरपंच संगीता हरगुडे,उद्योजक रामदास दरेकर, निलेश दरेकर, ग्रामपंचायत सदस्य तनुजा दरेकर, माजी सरपंच सुरेश हरगुडे, सुभाष दरेकर, नवनाथ दरेकर, नवनाथ हरगुडे आणि प्रा .अनिल गोटे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!