कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील कॅनरा बँकेच्या ए टी एम मशीनला अचानक भीषण आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.
मुख्य बाजार पेठेच्या ठिकाणी व नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या सणसवाडी येथील कॅनरा बँकेच्या एटीएम मशीनला अचानक आग लागली,आगीची तीव्रता भयानक असल्याने पुढील काचा फुटून गेल्या यावेळी एटीएम मशीनला आग लागल्याचे लक्षात येताच पुणे जिल्हा नियोजन समितीचे माझी सदस्य पंडित दरेकर यांनी पोलीस प्रशासन यांना याबाबत माहिती दिली.आगीच्या करणाची माहिती मिळाली नसून याबाबत प्रशासन पुढील तपास करत आहे.
यावेळी शेजारी असलेल्या कपड्यांच्या दुकानाला आग लागण्याची व इतर दुकानांना आग लागण्याची शक्यता असतात स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत पाणी मारले व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर ,माजी उपसरपंच सागर दरेकर, उद्योजक रामदास दरेकर,जागा मालक संतोष गोसावी, उत्तम दरेकर,मारुती दरेकर ,अमोल हरगुडे, रामेश्वर पाटील , प्रा.अनिल गोटे यांनी आहे विझवण्यासाठी मदत केली.