Friday, June 21, 2024
Homeक्राइमसणसवाडी येथे आढळला जळालेला मृतदेह

सणसवाडी येथे आढळला जळालेला मृतदेह

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एका अज्ञाताचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची खळबळजनक् घटना घडली असून घटनास्थळी तातडीने शिक्रापूर पोलीस दाखल झाले असून त्यांनी पुणे नगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

        सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे नगर महामार्गाच्या कडेला एक मृतदेह असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाल्याने शिक्रापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता रस्त्याच्या कडेला एक मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाल्याने सदर मृतदेह पुरुषाचा की महिलेचा याबाबत काही माहिती समजू शकली नसून घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, तर शिक्रापूर पोलिसांचे शोध कार्य व तपास सुरू झाले आहे.
        या घटनेचा शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, जमादार चौधर, पोलीस नाईक विकास पाटील, शिपाई रावडे व शिवणकर इतर कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!