Saturday, May 25, 2024
Homeस्थानिक वार्तासणसवाडी येथील हर्ष बाबासाहेब दरेकर व लहानग्यांनी साकारली किल्ले रायगडची प्रतिकृती

सणसवाडी येथील हर्ष बाबासाहेब दरेकर व लहानग्यांनी साकारली किल्ले रायगडची प्रतिकृती

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील
दिवाळी सुट्ट्यानिमित्त बच्चे कंपनीने माती, कागदी पुठ्ठे, रंग या साहित्यापासून रायगड किल्ल्याची प्रतिकृती पाच दिवसाच्या अथक मेहनतीने साकारली आहे.दिवाळीच्या सुट्यांमधे मुलांसाठी ही उत्साहाची आणि आवडीची गोष्ट असत .
सध्याच्या स्मार्ट फोनच्या जगात मुले गेम्स मध्येच अधिक रमत असल्याने किल्ले तयार करण्यासाठीचा उत्साह कुठेतरी कमी होत चालला असल्याचे चित्र आहे . दिवाळीतील हे दृश्य इतिहासजमा होत चालले आहे .बाजारात आयाते बनवलेले विविध रंगांचे किल्ले दाखल झाले आहेत . त्याचबरोबर शिवाजी महाराजांची मूर्ती , मावळे , गवळणी , सैनिक असे अनेक चित्रे सुद्धा विक्रीस ठेवण्यात आली आहेत . पूर्वी मातीचे किल्ले घरोघरी तयार केले जात असे पण शहरीकरण ,कमी प्रमाणात उपलब्ध असणारी जागा , खेळायला नसलेलं अंगण यामुळे किल्ला बनवायचा कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे यावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेला आयता बनवलेला किल्ला बिकट अनात दिवाळी साजरी करणे हा पर्याय निवडला जातो मात्र ग्रामीण भागातील मुलांमध्ये किल्ला बनवणे ही आवड आजही टिकून आहे यासाठी कुटुंबीयांची मोलाची साथ मिळत आहे..


दिवाळी म्हंटले की सर्वत्र किल्ला बनविण्यासाठी लहानग्यांची लगबग सुरू होत असे आपला किल्ला सुबक,देखणा व जास्तीत जास्त आकर्षक कसा करता येईल याकडे प्रत्येकजण बारकाईने लक्ष देत असे . दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्या की किल्ला तयार करण्याची लगबग सुरू होत असते . सध्याच्या सिमेंटच्या जंगलामध्ये मात्र हे फरश्या मोकळ्या जागा राहिल्या नसल्याने तसेच फ्लॅट सिस्टीमचे पेव फुटल्याने किल्ला बनविण्यासाठी जागाच उरल्या नाहीत . त्यामुळे आता एक परंपरा म्हणून बाजारातून पीओपीचा किल्ला विकत घेण्यावर नागरिक भर देत आहेत .
सणसवाडी येथील तनिष्का बाळासाहेब दरेकर, सर्वेश बाळासाहेब दरेकर,हर्ष बाबासाहेब दरेकर, श्रेया बाबासाहेब दरेकर यांनी आपल्या पालकांच्या मदतीने सुंदर अशी किल्ले रायगड यांची प्रतिकृती बनली आहे. या मातीपासून बनवलेला किल्ला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. या किल्ल्याची सर्वत्र चर्चा असून मुलांच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!