Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथील विकासकामांची आमदार अशोक पवार यांच्याकडून पाहणी

सणसवाडी येथील विकासकामांची आमदार अशोक पवार यांच्याकडून पाहणी

विकास कामांबाबत सणसवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे आमदार अशोक पवार यांच्याकडून कौतुक

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील विकास कामांची पाहणी आमदार अशोक पवार यांनी केली असून सणसवाडी ग्राम पंचायतीची विकास कामांचा दर्जा व गुणवत्ता यासह दूरदृष्टीने सौर दिवे बसवण्याचा अभिनव प्रयोग राबवणाऱ्या सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांच्यासह ग्राम पंचायत सदस्यांचे अभिनंदन केले.

उद्योगनगरी सणसवाडी ग्राम पंचायतिच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्याची पाहणी करण्यात आली.यावेळी सौर पथदिवे बसवत लाखो रुपयांचे वीज बिल वाचवण्याबरोबरच ग्रामस्थांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोटारी, ग्रामपंचायत कार्यालय सौर ऊर्जेवर लवकरच कार्यान्वित करण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती सरपंच संगीता नवनाथ हरगुडे यांनी दिली.

यावेळी सणसवाडीच्या सरपंच संगीता नवनाथ हरगुडे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर , उपसरपंच दत्तात्रय हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सुदाम दरेकर ग्रामपंचायत सदस्य शशिकला सातपुते , माजी चेअरमन सुहास दरेकर ,माजी चेअरमन सुरेश हरगुडे , माजी ग्रामपंचायत, सदस्य रामभाऊ दरेकर उद्योजक नवनाथ हरगुडे नवनाथ दरेकर सुभाष दरेकर ,शाम दरेकर , संतोष दरेकर, निलेश दरेकर प्रकाश जाधव, प्रा.अनिल गोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सुरू असून गावच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेला सुख सुविधा देण्यासाठी आग्रही असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे करता आली याबाबत माजी सभापती सुजाता पवार यांचेही मोलाचे मार्गदर्शन व योगदान असते. – उपसरपंच दत्तात्रय हरगुडे ,ग्राम पंचायत सणसवाडी

सणसवाडी गावच्या विकासासाठी आमदार अशोक पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असते.ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या एकिमुळे विकासकामे होत आहेत. ग्रामस्थांना अधिकाधिक सुख सुविधा देण्यासाठी आमही प्रयत्न करत आहोत. – सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, सणसवाडी

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!