कोरेगाव भीमा – दिनांक ८ मार्च
सणसवाडी ( ता.शिरूर) येथील नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.ग्राम पंचायत सणसवाडीच्या माध्यमातून शाळेच्या व गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच स्नेहल भुजबळ यांनी दिली.
नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयतील विद्यार्थ्यांना स्वतंत्र मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहाच्या उभारणी बाबत मागील अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती याबाबत विद्यालय प्रशासन व ग्राम पंचायत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते.तातडीने संबधित काम पूर्ण करण्यात येणार असून यासाठी अर्सलर मित्तल अँड निप्पोन लि सणसवाडी या कंपनीच्या सी.एस.आर फंडाच्या माध्यमातून सोळा लाख आठ हजार रुपये खर्च करून उभारण्यात येणार असून भूमिपूजन ८ मार्च म्हणजेच महिला दिनाचे औचित्य साधत विद्यालयातील महिला शिक्षक व महिला ग्रामपंचायत सदस्या सणसवाडी यांच्या शुभहस्ते करण्यात आले .
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब गोरे सणसवाडीच्या सरपंच स्नेहल भुजबळ, माजी सरपंच सुनंदा दरेकर ,ग्रामपंचायत सदस्या शशिकला सातपुते, रूपाली दरेकर, सुवर्णा दरेकर ,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बाबासाहेब साठे यांच्यासह पर्यवेक्षिका राधा कर्डिले त्याचप्रमाणे विद्यालयातील सर्व महिला शिक्षिका उपस्थित होते.