Friday, July 26, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास सी एस आर फंडाच्या माध्यमातून...

सणसवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास सी एस आर फंडाच्या माध्यमातून संगणक प्रयोगशाळा भेट

सी आर फंडाच्या माध्यमातून संगणक प्रयोग शाळेसह आत्तापर्यंत ९० लाख रुपयांचे काम करण्यात यश – माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळेतील ११ वी व १२ वी विज्ञान आणि कॉमर्स करीता संगणक प्रयोगशाळा अर्सेमित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सहकार्यातून संगणक कक्ष उभारण्यात आला असून याचा विद्यार्थी व विद्यार्थींना मोठा फायदा होणार असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती करता येणार आहे.

उद्याचा समाज सुजाण व गुणवत्तापूर्ण घडवायचा असेल तर आजच्या विद्यार्थ्यांना चांगले घडवले पाहिजे ही आपली सामाजिक जबाबदारी – सरपंच संगीता नवनाथ हरगुडे

या संगणक प्रयोगशाळे मुळे ३०० विद्यार्थी व विद्यार्थिनींना लाभ होनार आहे. मुलांची शिकण्याची आवड व बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होणार असून त्यांना भविष्यात एक चांगले डिज़ाइनर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेबसाइट डिजाइनर व एंड्राइड ऐप डेव्हलपर अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांचे भविष्य बनवता येतील आणि याची सुरुवात त्यांना आपल्या प्रात्यक्षिक संगणक प्रयोगशाळेतून निर्माण होइल अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांच्या माध्यमातून ६२ लाखांचे काम करण्यात आले होते. तीन कंपन्यांच्या माध्यमातून सणसवाडी शाळेच्या विकासासाठी १६ लखांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता तसेच आर्सेल मित्तल निपॉन कंपनीकडून १२ लाख रुपयांची अद्ययावत संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली असून सी एस आर फंडाच्या माध्यमातून ९० लाखांचे भरघोस काम करण्यात आले असल्याची माहिती माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर यांनी दिली.

यासाठी माजी सरपंच रमेश सातपुते, सावता माळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ यांचे मोलाचे योगदान असून विकास कामांवर बारकाईने लक्ष ठेवत कामाचा दर्जा व गुणवत्ता जपण्यासाठी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी ,मार्गदर्शक व ग्रामस्थ, ग्राम विकास अधिकारी बाळनाथ पवणे सहकार्य करत असतात.

माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर ,स्नेहल भुजबळ व सरपंच संगीता नवनाथ हरगुडे यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली असून आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणात विकासकामांचा आलेख उंचावत ठेवला तसेच सामाजिक जबाबदारी जपत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी काम केले आहे.

यावेळी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, स्नेहल भुजबळ ,ग्राम पंचायत सदस्य शशिकला सातपुते,सुवर्णा रामदास दरेकर, रूपाली दरेकर, दिपाली हरगुडे, ललिता दरेकर, मुख्याध्यापक गोरे सर, कर्डिले मॅडम उपस्थित होते.

आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शन व जिल्हा परिषद सदस्या व माजी सभापती सुजाता पवार यांच्या प्रेरणेने मोठ्या प्रमाणात काम करत असून समजातील गोर गरीबांच्या मुलांना उत्तम दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण , तंत्रज्ञान कुशल बनवण्यासाठी प्रयत्न करत असून आधुनिक युगातील स्पर्धेस सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम करणे व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहे – माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!