Friday, June 21, 2024
Homeस्थानिक वार्ताआमदार अशोक पवार यांनी सणसवाडीतील मयूर नगर मधील धोकादायक कनेक्शन बदलून घेतली...

आमदार अशोक पवार यांनी सणसवाडीतील मयूर नगर मधील धोकादायक कनेक्शन बदलून घेतली नागरिकांच्या जीविताची काळजी

सिंगल फेज कनेक्शन चे थ्री फेज कनेक्शन करत २०० मिटर केबलसह दुरुस्ती

आमदार ॲड अशोक पवार यांच्या सूचनेनुसार वीज वितरण विभागाने केली तातडीने कार्यवाही

सणसवाडी ( ता.शिरूर) येथील मयूर नगर मधील एम एस सी बी महामंडळाच्या वीज खांबावर मोठ्या प्रमाणात वेलिंचा वेढा खांबाला पडला होता.यामुळे शॉर्ट सर्किट व नागरिकांच्या जीविताला हनी पोचण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी याबाबत पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पंडित दरेकर यांना सांगितली यावर पंडित दरेकर यांनी तातडीने आमदार अशोक पवार यांना याबाबत माहिती दिली.

आमदार ॲड अशोक पवार यांनी तातडीने शिक्रापूर विभागाचे वीज वितरण महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांना सूचना करताच महाजन यांनी तातडीने याबाबत लक्ष देत नागरिकांच्या जीविताची कलाजी घेत तातडीने कर्मचाऱ्यांना सूचना करत मयूर नगर येथील संबधित खांबाच्या वर आलेल्या व कनेक्शन बोर्डाला वेढलेली वेली तातडीने काढण्याचे काम साडेपाच तासानंतर यश आले.

यावेळी मयूर नगर मधील नागरिकांच्या मागणीनुसार सिंगल फेज कनेक्शन बदलून थ्री फेज कनेक्शन करण्यात येऊन २०० मिटर केबल बसवण्यात आल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत आमदार अशोक पवार व पंडित दरेकर यांच्या माध्यमांतून दिवाळीची अनोखी व अविस्मरणीय भेट मिळाल्याची भावना व्यक्त केली.

आमदार अशोक पवार व सणसवाडी ग्रामस्थांच्या आपुलकीचा व घनिष्ठ तेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून आमदार अशोक पवार यांना सणसवाडी ग्रामस्थांनी विधायक कामाची मागणी करताच नेहमीच कर्तव्यतत्पर असणाऱ्या आमदारांच्या कामाचा पुन्हा एकदा ग्रामस्थांना परिचय आला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!