Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी  येथील  मयुरनगर दुर्गामातेची आमदार अशोक पवार यांच्या हस्ते आरती

सणसवाडी  येथील  मयुरनगर दुर्गामातेची आमदार अशोक पवार यांच्या हस्ते आरती

आकर्षक रांगोळी, फुलांची उधळण, सवाद्य मिरवणूक व फटाकड्यांची आतषबाजीत राष्ट्रवादी पुन्हा गाण्यावर आमदार अशोक पवार यांचे भव्य जल्लोषात स्वागत

सणसवाडी – सणसवाडी (ता. शिरूर) येथील  मयुरनगर आयोजीत दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या दुर्गामातेची आरती आमदार अशोक पवार यांच्या हस्ते संपन्न झाली.यावेळी उपस्थिती आमदार अशोक पवार यांच्यावर फुलांची उधळण करत  जल्लोषाच्या वातावरणात सहर्ष स्वागत केले.

    उद्योगनगरी सणसवाडी(ता.शिरूर)  व आमदार अशोक पवार यांच्या जिव्हाळ्याचे व प्रेमाचे असे अनोखे नाते असून याची पुन्हा एकदा प्रचिती आली असून आकर्षक फेटा, ठिकठिकाणी कार्यकर्ते स्वागतासाठी उभे तर आमदार पवार यांच्या स्वागतासाठी फटाकड्यांची आतषबाजी, पारंपरिक वाद्यांच्या गजरात व फुलांच्या वर्षावात आमदार अशोक अपार यांचे मयूर नगर येथील दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळाच्या आरती प्रसंगी आमदार अशोक पवार यांचे दिमाखदार असे स्वागत करण्यात आले.

यावेळी आवाज कोणाचा ,आवाज जनतेचा दहिबदिषात घुमला राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यावर तरुणाई व आबालवृद्धांनी मोठा आनंद व्यक्त केला.

 यावेळी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, मंडळाचे आधारस्तंभ रामदास दरेकर, मंडळाचे संस्थापक पंडित  दरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष  विश्वास ढमढेरे ,युवक पुणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, शिक्रापूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन ,शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक अध्यक्ष तुषार दसगुडे, कार्याध्यक्ष  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर प्रमोदसिंह गोतरणे ,माजी पंचायत समिती सदस्य पी के  गव्हाणे, रांजणगाव  गणपती देवस्थानचे अध्यक्ष विजयराज दरेकर, माजी पंचायत समिती सदस्या  सविता दरेकर, माजी सरपंच सुनंदा दरेकर, माजी सरपंच संगीता हरगुडे,माजी सरपंच स्नेहल भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर,अक्षय कानडे, ग्रामपंचायत सदस्या शशिकला सातपुते,तनुजा दरेकर,ललिता दरेकर, रुपाली दरेकर ,सुनिता दरेकर सावता परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष गोरक्ष भुजबळ माजी चेअरमन सुहास दरेकर , मुख्याध्यापक  गोसावी सर शालेय समिती अध्यक्ष अनिल दरेकर ,  अमोल हरगुडे, ॲड  अक्षय  हरगुडे , ॲड शुभम  दरेकर, मंडळांचे अध्यक्ष लक्ष्मण दरेकर, उपाध्यक्ष अशोक करडे ,मंडळाचे संचालक निलेश दरेकर, रविराज दरेकर, सुभाष दरेकर उत्तम दरेकर, अनिल गोटे, विठ्ठल दरेकर, नवनाथ हरगुडे, नवनाथ दरेकर, राजेश भुजबळ,बाळकृष्ण दरेकर ,संतोष शेळके , नांगरे साहेब, आणि ग्रामस्थ व माताभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!