Tuesday, September 10, 2024
Homeताज्या बातम्यासणसवाडी येथील प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल काळूराम हरगुडे यांची निवड

सणसवाडी येथील प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल काळूराम हरगुडे यांची निवड

कोरेगाव भीमा – उद्योगनगरी सणसवाडी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वसेवाडी ( ता.शिरूर ) येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल काळूराम हरगुडे यांची निवड करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक व समिती सचिव संतोष गोसावी यांनी दिली.

शालेय समितीचे अध्यक्ष सागर हरगुडे यांनी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने अध्यक्षपदी अमोल काळूराम हरगुडे यांचं निवड करण्यात आल्याने सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले तर ग्रामस्थांनी याबाबत आनंद व्यक्त केला. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल हरगुडे ,उपाध्यक्ष अमोल दरेकर यांसह समिती सदस्यांना फेटे बांधत पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, माजी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव , मोहन हरगुडे , माजी सरपंच चेअरमन सुरेश हरगुडे , गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन गजाबापू हरगुडे ,नवनाथ हरगुडे ,सागर हरगुडे, विकास हरगुडे,नाना दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व नवनविन कलागुण, अत्याधूनिक तंत्रज्ञान , स्पर्धात्मक युगाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक क्षमता विकसित करण्यासाठी  शालेय शिक्षक, व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत असतात.

यावेळी मावळते अध्यक्ष सागर हरगुडे, उपाध्यक्ष अमोल दरेकर, सचिव मुख्याध्यापक संतोष गोसावी ,अमोल कुंडलिक हरगुडे, सेवागिरी रणपिसे, ग्राम पंचायत सदस्या स्थानिक प्रतिनिधी ललिता दरेकर, रंजना हर गुडे सोनाली पवार, संगीता नागरगोजे,अश्विनी सावंत समिती पदाधिकारी उपस्थित होते.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसह भौतिक सोयीसुविधासह शाळा परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल काळूराम हरगुडे , शालेय व्यवस्थापन समिती , वसेवाडी

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या सणसवाडी मधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध असून यासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्राम पंचायत यांच्या माध्यमातून काम करण्यात येणार आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल हरगूडे यांच्या शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. – सरपंच संगीता नवनाथ हरगुडे

फोटो ओळ – सणसवाडी (ता.शिरूर) येथील नवनिर्वाचित अध्यक्ष अमोल काळूराम हरगुडे यांचा सत्कार करताना ग्रामस्थ

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!