Monday, June 17, 2024
Homeक्राइमसणसवाडी येथील पाझर तलावात आढळला पुरुषाचा मृतदेह

सणसवाडी येथील पाझर तलावात आढळला पुरुषाचा मृतदेह

कोरेगाव भिमा – दिनांक २८ डिसेंबर सणसवाडी (ता.शिरूर) येथील डोंगर वस्ती जवळील पाझर तलावात एका चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या पुरुषाचा मृतदेह सापडला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत सणसवाडी चे पोलीस पाटील दत्तात्रय माने यांनी खबर दिली आहे.

सणसवाडीचे पोलीस पाटील यांना सकाळी साडे नऊच्या सुमारास एका नागरिकाने डोंगरवस्ती जवळील पाझर तलावामध्ये एक मृतदेह असल्याचे कळवताच पोलीस पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी तातडीने पोचत सदर मृतदेह तलावाच्या बाहेर काढत शवविच्छेदनासाठी सरकारी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

संबधित मृत व्यक्तीची उंची पाच, गोल चेहरा व अंगात काळया रंगाचा टी शर्ट व पँट घातली आहे. संबधित प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!