Saturday, November 2, 2024
Homeस्थानिक वार्तासणसवाडी येथील डोंगर वस्ती पिंपळे जगताप रोड मोरी व काँक्रीटरस्त्याचे काम प्रगतीपथावर

सणसवाडी येथील डोंगर वस्ती पिंपळे जगताप रोड मोरी व काँक्रीटरस्त्याचे काम प्रगतीपथावर

रस्त्याची पाहणी करताना पंडित दरेकर, ललिता दरेकर व ग्रामस्थ

आमदार अशोक पवार यांच्या सुचनेने पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्या निधीतून ५ लक्ष रुपयांचे काम सुरू

कोरेगाव भीमा – दिनांक ९ जूनसणसवाडी ( ता.शिरूर) मागील अनेक दिवसांपासून सणसवाडी येथील नागरिक रस्त्याच्या अडचणीमुळे त्रस्त होते. शेतकरी , नागरिक ,कामगार ,विद्यार्थी व महिला भगिनी यांची रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती त्यावेळी डोंगर वस्ती व परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या कामाबाबत आपले व्यथा आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती. याबाबत आमदार अशोक पवार , माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार व पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर यांनी याबाबत तातडीने डोंगर वस्ती पिंपळे जगताप रोड मोरी व काँक्रीट रस्त्याचे काम सुरू केले असून याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आमदार अशोक पवार व पुणे जिल्हा नियोजन सिटी सदस्य पंडित दरेकर यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. तो पूर्ण केला असून रस्त्याच्या कामामुळे नागरिक, कामगार ,महिला व विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असून प्रवास सुखकर होण्यासाठी मदत होणार आहे. या रस्त्याची पाहणी नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर , ग्रामपंचायत सदस्या ललिता दरेकर ,चेअरमन सुहास दरेकर ,हिरामण दरेकर ,प्रा.अनिल गोटे,निलेश दरेकर व ग्रामस्थव नागरिकांनी केली.

डोंगर वस्ती व परिसरातील नागरिकांची रस्त्याच्या कामाबाबत मागणी होती, नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी काम करत असून परिसरातील सर्वांगीण विकासासाठी आमदार अशोक पवार व सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. – पंडित दरेकर , सदस्य , पुणे जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!