विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे केले सादरीकरण
कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथील नोव्हेल प्राइड इंग्लिश स्कूल मध्ये शिवजयंती अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पाडण्यात आली.यावेळी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा , मिरवणूक ,सरदार ,मावळे अशा ऐतिहासिक वेशभूषा करत ,छत्रपती शिवाजी महाराजांवर लहान मुलांनी इंग्लिश व मराठीमध्ये आपली अभ्यासू भाषणे करत उपस्थितांना आश्चर्यचकित केले.विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक गितांवर सादरीकरण करत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती अत्यंत दिमाखदार पध्दतीने साजरी केली.
यावेळी शाळेचे संस्थापक विनोद गव्हाणे,मुख्याध्यापिका प्रियांका देशमुख , शिक्षिका सरिता घोगरे , मनीषा टेकड़े ,मीनाक्षी हरगुडे , आशा भांगे व पालक वर्ग उपस्थित होते.