Thursday, July 25, 2024
Homeस्थानिक वार्तासणसवाडी ग्राम पंचायतीचे माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

सणसवाडी ग्राम पंचायतीचे माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण केल्याने सरपंच संगीता हरगुडे यांचे नागरिकांकडून अभिनंदन

देशसेवेसाठी उभे आयुष्य वेचणाऱ्या जवानांचा अनोखा सन्मान

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) येथे आझादी का अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात व अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. सरपंच सरपंच संगीता हरगुडे व ग्राम पंचायत पदाधिकारी यासाठी एक विचाराने ध्वजारोहण करण्यासाठी माजी सैनिक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते करत अनोखा सद्भावना उपक्रम राबवत आहे.देशाच्या सुरक्षिततेसाठी उभ आयुष्य वेचणाऱ्या सैनिकांचा सन्मान सोहळा करण्यात आला.

माजी सैनिक सुरेश उमाव,आनंदराव ढमढेरे, दत्तात्रय दरेकर, चंद्रकांत लांडगे, संतोष यादव, शंकर दौंडकर. विकास भुजबळ, विठ्ठल जगताप, सचिन दरेकर, मच्छिंद्र दरेकर, सतीश दरेकर, संदीप दरेकर या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करत त्यांचा सन्मान करण्यात आला. आझादी का अमृतमहोत्सवानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा ‘ मोठ्या प्रमाणावर साजरा होत असताना. भारतीय सैन्यात अहोरात्र सेवा बजावत आपल्या कुटुंब ,घर,गाव यापासून लांब राहत उभ आयुष्य देशाच्या सेवेसाठी समर्पित केले अशा माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

यावेळी उद्योगनगरी सणसवाडी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, उपसरपंच सागर दरेकर, ग्रामसेवक बाळनाथ पवणे, उद्योजक नवनाथ हरगुडे, दगडू दरेकर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

सैनिक देशासाठी अहोरात्र तळहातावर जीव घेऊन आपले संरक्षण करतात म्हणून आपण सुरक्षित जीवन जगतो.त्याचे आयुष्य देशाच्या सीमेवर जाते त्यांचा त्यागा,शौर्य व बलिदान यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ग्रामपंचायत सणसवाडी येथील ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आल्याने खूप समाधान व आनंद वाटत आहे. – सरपंच संगीता नवनाथ हरगुडे ग्राम

ग्राम पंचायत सणसवाडी येथील ध्वजारोहण करताना माजी सैनिक
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!