Saturday, July 27, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?सणसवाडी ग्रामस्थांचा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास साखळी उपोषणाने देण्यात येणार पाठिंबा

सणसवाडी ग्रामस्थांचा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास साखळी उपोषणाने देण्यात येणार पाठिंबा

कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे मराठा आरक्षणासाठी शिरूर तालुक्यातील उद्योगनगरी असणाऱ्या सणसवाडी गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार  (ता.३०) पासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार असून  यामध्ये अबालवृद्ध ,शेतकरी,महिला भगिनी व युवक यांचा मोठ्या प्रमाणावर उत्सुर्त सहभाग राहणार असून या साखळी उपोषणात  मराठा बांधव सहभागी होणार आहेत.

    समस्त ग्रामस्थ सणसवाडी यांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी अंतरवाली येथे मनोज जारंगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने दिंनाक ३०/१०/२३ रोजी ग्रामस्थ सकाळी ९ ते ५ या वेळेत साखळी पद्धतीने उपोषण करण्यात येणार असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी अंदोलकांकडून मराठा समाजातील बांधवांना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आपण पद बाजूला ठेऊन उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!