Wednesday, July 24, 2024
Homeइतरसणसवाडी ग्रामनगरीच्या सरपंचपदी रुपाली दगडू दरेकर व उपसरपंचपदी राजेंद्र दरेकर यांची बिनविरोध...

सणसवाडी ग्रामनगरीच्या सरपंचपदी रुपाली दगडू दरेकर व उपसरपंचपदी राजेंद्र दरेकर यांची बिनविरोध निवड

तातडीने ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून गावचा सर्वांगीण विकास करणार  – उपसरपंच राजेंद्र दरेकर

कोरेगाव भीमा – उद्योगनगरी सणसवाडी (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने सरपंचपदी काम करण्याची संधी दिली आहे.यावेळी सासऱ्यांची व ज्येष्ठ मार्गदर्शकांची आठवण येत असून गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून विकासाला प्राधान्य देत नागरिकांना विविध सेवा सुविधा पुरवण्यासाठी व भावी पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच रुपाली दगडू दरेकर यांनी सांगितले.

सर्वांना पदे भेटत असतात पण पदापेक्षा माणसाचे मन मोठे असावे लागते नवनिर्वाचित सरपंच रुपाली दगडू दरेकर यांच्या कुटुंबीयांचे मन मोठे असल्याची भावना माजी उपसरपंच युवराज दरेकर यांनी व्यक्त केली.

     उद्योगनगरी सणसवाडी (ता.शिरूर)  येथील सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांनी ठरलेल्या वेळी राजीनामा दिल्याने सरपंच पदासाठी रुपाली दगडू दरेकर व उपसरपंच पदासाठी राजेंद्र दरेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी माजी सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, माजी सरपंच स्नेहल राजेश  भुजबळ, संगीता नवनाथ हरगुडे, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, सागर दरेकर, ग्राम पंचायत सदस्य अक्षय कानडे,मोहन हरगुडे, राहुल हरगुडे, मोहन नाना हरगुडे, ललिता सातपुते, ललिता दरेकर, कु. निकिता हरगुडे, तनुजा दरेकर उपस्थित होते. कोरेगाव भीमाचे मंडल अधिकारी विकास फुके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले त्यांना ग्रामसेवक बाळनाथ पवणे यांनी मदत केली.

उद्योगनगरी सणसवाडी गावच्या सरोनाचोडी व उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्यावर भव्यदिव्य अशी  विजयी मिरवणूक काढत क्रेनला लटकलेला एकवीस फुटांचा भला मोठा आकर्षक  पुष्पहार , ढोल ताशा यांचा लयबद्ध ठेका आणि गुलालाची मुक्तहस्ते उधळण करत ठिकठिकाणी काढलेली रांगोळी आणि फटाकड्यांची आतषबाजी तसेच गावातील ग्राम दैवत भैरवनाथ महाराजांचे सजवलेले आकर्षक मंदिर , महिला भगिनी व पुरुषमंडळी यांना बांधलेले आकर्षक फेटे व आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण यामुळे सरपंच रुपालीताई दगडू नाना दरेकर व उपसरपंच राजेंद्र दरेकर यांचा बिनविरोध निवडीचा आकर्षक व अविस्मरणीय सोहळा सणसवाडी करांना  अनुभवता आला.

वॉर्ड क्रमांक तीनच्या विकासाकडे लक्ष देत सर्वांगीण विकास करावा असे ग्राम पंचायत सदस्या  कू निकिता  हरगुडे यांनी व्यक्त केल्यावर उपस्थितांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. सरपंच सुवर्णा दरेकर व उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांच्या कार्यकाळ गावाला विकासाच्या उंचीवर नेत असताना भावी पिढी घडवणारा ,पालकांना जागृत करत विद्यार्थ्यांना घडवणारा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. 

सरपंच सुवर्णा रामदास दरेकर यांनी ग्रामस्थांचे, मार्गदर्शक व कर्मचाऱ्यांचे आभार मानत खूप कामे करण्यात आली आहेत काही कामे बाकी आहेत तीही पूर्ण होतील गावच्या सर्वांगीण विकासासाठी बांधील असून आम्ही सर्वजण ग्रामस्थांच्या कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले.

     यावेळी उद्योजक रामदास दरेकर यांनी सूत्रसंचालन केले तर उद्योजक दगडू नाना दरेकर यांनी आभार व्यक्त करत ग्रामस्थांचे आभार मानत आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना व कृतज्ञता व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नावर ग्रामस्थ एक होत प्रसंगी विकत जागा घेऊन हॉस्पिटल काम पूर्ण करुयात अशी भावना दत्तात्रय हरगुडे यांनि व्यक्त केली.

 माजी उपसभापती आनंदराव हरगुडे, माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, मनसे पुणे जिल्हा प्रमुख रामदास दरेकर,माजी उपसरपंच युवराज दरेकर ,  माजी उपसरपंच बाबासाहेब माजी उपसरपंच संभाजी साठे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल दरेकर सावता माळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, सरपंच राहुल गव्हाणे , माजी चेअरमन व  श्रावणबाळ म्हणून ओळख असणारे गोरक्ष दरेकर, चंद्रकांत दरेकर, रामदास खुशाल दरेकर, माजी सरपंच रमेश सातपुते, बच्चु गव्हाणे, वामन भांडवलकर ,माजी चेअरमन सुहास दरेकर, रमण दरेकर ,निलेश दरेकर यांच्यासह विविध आजी माजी पदाधिकारी,महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सणसवाडी गावच्या सरपंच सुवर्णा रामदास दरेकर व उपसरपंच दत्तात्रय हरगुडे यांनी वेळेत राजीनामा देत दिलेल्या शब्दाला कृतीत आणत वेळेत राजीनामा दिला याबद्दल सर्वांनी कौतुक केले माजी उपसरपंच विजयराज दरेकर यांनी पॅनल प्रमुखांची भूमिका व त्याग यामध्ये युवराज दरेकर यांच्या सक्षम व कर्तृत्ववान नेतृत्वामुळे सर्व काही वेळेत केले गेले आम्ही वेळेत राजीनामा दिला यापेक्षा त्यांचे नैतिक बंधन , सामूहिक फुल पण जबाबदारी व दिलेल्या शब्दाला पूर्ण करणे महत्वाचे होते ते युवराज बापू दरेकर यांच्यामुळे पूर्णत्वाला गेले.

सणसवाडी ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रगतीसाठी कटिबद्ध असून सर्वांची मने जपण्याचा व संवाद साधण्याचा प्रयत्न करणार असून तातडीने ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – नवनिर्वाचित उपसरपंच राजेंद्र दरेकर

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!